Video : आधारश्रमातील चिमुकल्या जाई-जुईला मिळाले ‘न्यूयार्क’चे ‘आई-बाबा’

0
नाशिक : शहरातील  आधारश्रमातील नऊ महिन्यांच्या जुळ्या जाई आणि जुईला अमेरिकेतील एका उच्चशिक्षित दाम्पत्याने दत्तक घेतले.

जाई आणि जुई नऊ महिन्यांच्या असून त्यांना जन्मताच हार्ट आणि सिकलसेलचा आजार आहे. अमेरिकेतील सोफ्टवेअर इंजिनियर क्रीस्तोफर मायकेल हिदगर आणि त्यांची पत्नी तारा क्रिस्टोफर हिदगर या शिक्षिका असून त्यांना आज जाई-जुईला घेऊन मायदेशी निघाल्या.

न्यूयार्क येथे हे दाम्पत्य नोकरीस आहे. त्यांच्याकडून ऑनलाईन प्रक्रिया जवळपास जानेवारी २०१७ पासून सुरु होती. अखेर आज सकाळी दत्तकप्रक्रिया पूर्ण करून जाई-जुईला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

हे दाम्पत्य सकाळी आधाराश्रमात दाखल होताच ते जाई-जुईसोबत खेळण्यात मग्न होते. आधारश्रमातील सर्वच कर्मचारी यावेळी उपस्थित होते हिदगर दाम्पत्याचे प्रेम बघून तेही भारावले होते.

२०१५ पासून दत्तक प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. आजपर्यंत नाशिक आधारश्रमातून १२ मुले परदेशात पाठविण्यात आली आहे. तर देशात जवळपास ८५० हून अधिक मुले दत्तक देण्यात आली आहेत.

या मुलांची तपासणी दत्तक पत्रकात नमूद केलेल्या संस्थांकडून केली जाते. विदेशातही अशाच संस्था या मुलांकडे लक्ष देत असतात, अशी माहिती आधारश्रमाकडून देण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*