Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सह्हायक पोलीस निरीक्षकांसह तीन पोलीस नाईक लाच घेताना जाळ्यात

Share
राहुरी खुर्द येथील महावितरण कार्यालयासमोर प्रस्तावित उपोषण मागे घेण्यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांना तीन लाखांची खंडणी मागणार्‍या एका जणावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नाशिक : आडगाव पोलीस ठाण्यात दाखल तक्रार प्रकरणात कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणारा सहाय्यक पोलिस निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी लाच . शुक्रवारी (दि. ०६) रोजी ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद येथील तक्रारदार असणाऱ्या महिलेच्या भावाविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. या प्रकरणी पोलिसांनी दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व त्याला दुस-या गुन्ह्यांत न टाकण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी तक्रारदार महिलेकडे केली यावेळी तक्रारदार महिलेने ४ हजार रुपये देण्याचे कबुल केले.

सदर रक्कम अटकेत असणाऱ्या कैलास काकडे यांच्याकडे देण्याचे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार महिलेने (दि.०६) काकडे यांच्याकडे रक्कम दिली ती त्यांनी स्वीकरलेली आहे.

साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश चंद्रकांत पाटील (वय ४३), पोलीस नाईक अनिल दामाजी केदारे(वय ४८) पोलीस नाईक मिथुन किसनराव गायकवाड (वय ३८), पोलीस नाईक प्रदीप कचरू जोंधळे (वय २७) (सर्व नेमणूक पोलीस ठाणे आडगाव ) अशी प्रोत्साहन व लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

दरम्यान यासाठी औरंगाबाद येथील पोलिसांनी सापळा रचून ही कामगिरी यशस्वी केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!