Type to search

Breaking News ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : नशा निषेध दिवस | व्यसन ही समाजाला लागलेली कीड

Share

आंतरराष्ट्रीय आमली पदार्थ तस्करी आणि नशा निषेध दिवस दरवर्षी २६ जुनला साजरा करण्यात येतो. १९८७ पासून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या दिवसाचे महत्व म्हणजे लोकांमधे नशासंबंधी समस्यांवर जनजागृती निमार्ण करणे व दूसरीकडे व्यसनाधिन व्यक्तिचा नशेवर नियंत्रण करून योग्य उपचार करणे आहे सोबतच जागतिक स्तरावर होणाऱ्या नशेचा अवैध व्यापारावर संपुर्णरित्या नियंत्रण करणे आहे.

संयुक्त राष्ट्र संघ तर्फे दरवर्षी एका नवीन थीम घेवून कार्य केले जाते. ह्यावर्षीची थिम ”स्वास्थ न्यायाकरीता व न्याय स्वास्थाकरीता“ आहे. संयुक्त राष्ट्रच्या रिपोर्टप्रमाणे जागतिक स्तरावर अफिम (हेरोईन) मोठ्याप्रमाणात तयार करून अवैध विक्री केली जाते. ज्यात भारताचा सुद्धा मोठा वाटा आहे. आपल्या देशात साधारणपणे १५००-२००० हेक्टर अफिमची अवैध शेती केली जाते. ही खूपच गंभीर बाब आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेहमीच कोट्यावधीची हेरोईनची अवैध तस्करी पकडल्याची बातमी ऐकायला मिळते. अशा अवैध व्यापार संबंधी अपराध जगभरात घडतच आहेत.

मानव आपल्या परंपरा, प्रथा, कर्तव्य, संस्कारा पासून दूर होऊन आधुनिकतेच्या आधंळ्या मार्गावर भरकटत चाललाय. युवावर्गात नशा खुप वेगाने वाढत चालला आहे. पहिल्यांदा व्यसन अतीउत्साहात, दबावाखाली, खूप ताणतणावात, जिज्ञासापोटी, मित्रांसोबत, उत्सवांमधे, आधुनिकतेच्या दिखाव्यात व इतर मार्गे करत असतो. आमली पदार्थाचे व्यसन पुष्कळ प्रकारचे आहेत. यामध्ये ड्रग्स, तंबाकु, अल्कोहल, चरस, गांजा, अफीम, भांग याचा व्यतिरिक्त पेट्रोल, वाॅइटनर, फेविकाॅल सारख्या वस्तुंचा उग्र वास घेणे व इतर.

व्यसन करण्याची कारणे :

बेकारी, निराशा, जीवनातील संघर्ष, ताणतणाव, नवा अनुभव, नैराश्यपण, फॅशन, कटुता, कौटुंबिक भांडणे, एकटेपणा, अज्ञानता, वाईट संगत, शारिरीक व मानसिक आजार, अपयशपणा, आर्थिक समस्या, कामाचा ताण यामुळे व्यसन लागण्याची शक्यता असते. पण आजकाल कोणताही कार्यक्रम असो जसे वाढदिवस, लग्न, सहल, पार्टीच्या नावाखाली नशा केला जातो. तसेच या गोष्टी सहज मिळतात ही खूप मोठी चिंतेची बाब आहे. पुढे जाऊन हे व्यसन माणसध्या सवयीत बदलताना दिसते.

परंतु या सर्व व्यसनांमुळे समाजात घर तुटतात, आत्महत्या, गरीबी, बेकारी, भिक्षावृत्ती, वेश्यावृत्ती, वाहनांचे अपघात, मृत्यूदरवाढ व अपराधात विशेष रूपाने मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. अशा प्रकारे आर्थिक पारिवारीक सामाजिक मुल्यांचा नाश होतो. व्यसनी माणूस नशेचा सवयीने एक चांगला नागरीक, पालकदाता, संरक्षक, मार्गदर्शक, जबाबबदार, नियंत्रकाची योग्य भुमिका कधीच पार पाडू शकत नाही. समाजात अपराधांचा ग्राफ खूप वेगाने वाढतोय आणि ५० टक्के अपराध नशेकरिता केले जातात.

व्यसनावर स्वनियंत्रणाचे उपाय :

व्यसनी व्यक्तीचे स्वनियंत्रण दृढनिष्चय आणि मदत समूह सर्वात चांगले नियंत्रण आहे. नशेपासून लांब जाणे, स्वचिकीत्सा करणे, डाॅक्टरांशी मोकळेपणाने बोलावे, प्रश्नाचे तज्ञांद्वारा निराकरण करणे, नेहमी परिवारासोबतच रहावे, आतापर्यत झालेल्या खर्चाचे मूल्यांकन करून पहावे. आपल्या स्वताची काळजी घेणे, र्निव्यसनी लोकांचा संपर्कात येणे, ध्यानसाधना करणे, छंद जोपासायला शिकणे, ताणतणावाला स्वास्थ मार्गाने सोडविणे व निरंतर चिकीत्सा करत रहावे. विशेष रूपाने पालकांनी आपल्या मुलांसोबत एका मित्राप्रमाणे व्यवहार करावा, त्यावर नियंत्रण ठेवावे, मुलांवर चांगले संस्कार व त्यांना योग्य वातावरण निर्माण करून देणे.

एकंदरीत व्यसन हि समाजाला लागलेली कीड असून यापासून अलिप्त राहणे महत्त्वाचे ठरते. जेणेकरून आपल्याला या व्यसनाची सवय जडू नये. यासाठी वरील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

-डाॅ. प्रितम भि. गेडाम

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!