Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या हिट-चाट

Video : लोक मुल दत्तक घेतात, ‘या’ पठ्यान बिबट्या दत्तक घेतलाय; बघा कोण आहे तो?

Share

नाशिक : आपल्या दैनंदिन जीवनात मुल दत्तक घेणं म्हणजे विशेष मानलं जात. तर काही लोक गाव देखील दत्तक घेतात. पण मराठी चित्रपट सृष्टीतील एका अभिनेत्याने चक्क बिबट्या दत्तक घेतला असून यामुळे त्याच विशेष कौतुक होत आहे.

सुमित राघवन याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एका मादी बिबट्यास दत्तक घेतले असून तिचे ‘तारा’ असे नामकरणही केले आहे. तर झालं असं सुमीत राघवन आणि सुबोध भावे ही जोडगोळी जितेंद्र जोशींच्या ‘दोन स्पेशल’ च्या पहिल्या भागाला हजेरी लावली. या कार्यक्रमाचा प्रोमो समोर नुकताच आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता सुमीत राघवन त्याच्या आगळ्या वेगळी मानसकन्या ‘तारा’ विषयी बोलत आहे.

दोनSpecial | Colors Marathi

लोकं मुलं दत्तक घेतात, गाव दत्तक घेतात पण लोकप्रिय अभिनेता Sumeet Raghvan ने अनोखंच काहीतरी दत्तक घेतलंय. जाणून घेण्यासाठी पाहा #दोनSpecial आजपासून गुरु-शुक्र. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर.

Posted by Colors Marathi on Thursday, 31 October 2019

सुमीतची आणि ताराची भेट एका कार्यक्रमा दरम्यान झाली. ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमादरम्यान सुमीतने हा किस्सा शेअर केला. सुमीत राघवन एक उत्तम कलाकारही आहेच पण संवेदनशील माणूसही आहे. हे त्याने दाखवून दिलं आहे. या कार्यक्रमात अनेक प्रश्न विचारून जितेंद्रने या दोन्ही कलाकारांची फिरकीही घेतली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!