Type to search

हिट-चाट

Video : संजय दत्तचे ‘बाबा’ या चित्रपटातून मराठीत पदार्पण

Share

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेकांनी मराठीत पाऊल ठेवले आहे. यामध्ये अजय देवगण, विवेक ओबेरॉय, माधुरी दीक्षित यामध्ये आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे. अभिनेता संजय दत्त ‘बाबा’ या सिनेमातून मराठीत पदार्पण करता आहे.

बालकलाकार म्हणून आपल्या करियरला सुरुवात करणारा संजय दत्त १९८१ साली प्रदर्शित झालेल्या रॉकी चित्रपटामुळे रातोरात स्टार बनला. त्यानंतर आजपर्यंत गेल्या ३८ वर्षांत संजय दत्तने अनेक हिट चित्रपट दिले.


 

आता संजय दत्त चक्क मराठीमध्ये ‘बाबा’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहे. संजय दत्त प्रोडक्शनचा हा पहिला मराठी चित्रपट २ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. संजय दत्त या चित्रपटामध्ये एका अभिनेत्याच्या नाही तर निर्मात्याच्या भूमिकेत असणार आहे.

ट्विटरवर संजयने याबाबत एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. ही पोस्ट करताना संजयने हा चित्रपट आपल्या वडिलांना समर्पित असे लिहिले आहे. वडिलांच्या आठवणीवर अधिक प्रकाश या चित्रपटुन टाकण्यात आलं आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणार त्यांनी संजयला सर्पतोपारी मदत केली होती. संजयची पत्नी मान्यता दत्तने ही याबाबत पोस्ट केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!