Type to search

नाशिक : अभिनेता अजय देवगण यांनी वडिलांच्या अस्थींचे रामकुंडात केले विसर्जन

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : अभिनेता अजय देवगण यांनी वडिलांच्या अस्थींचे रामकुंडात केले विसर्जन

Share

नाशिक : अभिनेता अजय देवगण यांचे वडील तसेच बॉलिवूडचे प्रसिद्ध अँक्शन दिग्दर्शक वीरू देवगण यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या अस्थींचे विसर्जन आज रामकुंडात अजय देवगण यांनी केले.

आज सकाळी १० वाजता गोदावरीच्या रामकुंडावर विसर्जन करण्यात आले. यावेळी सतीश शुक्ल, देवगण परिवाराचे वंश परंपरागत गुरुजी महेंद्र पाराशरे, मनोज चंद्रात्रे, अतुल गायधनी व रवींद्र देव यांनी पौराहित्य केले. यावेळी अजय देवगण ला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

तब्बल ८० हून अधिक हिंदी चित्रपटांसाठी अँक्शन सीन्सचे दिग्दर्शन वीरू देवगण यांनी केले आहे. शिवाय त्यांनी हिंदुस्तान की कसम, जिगर, मि. नटवरलाल यासारख्या काही सिनेमांचे दिग्दर्शनही केले होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!