आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने 145 पॉर्न साईटवर अपलोड केले पीडितेचे फोटो

0

नाशिक । दि. 16 प्रतिनिधी

लग्नाचे अमीष दाखवत पिडीत मुलींचे अश्लिल फोटो काढून ते तब्बल 145 पॉर्न साईट्सवर अपलोड करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात अर्ज सादर केला असून, सदर फोटो काढून टाकण्यासाठी इंडियन कम्प्युटर इर्मजन्सी रिसपॉन्स टीमची (सीईआरटी-इन) मदत नाशिक पोलिस घेत आहेत. तसेच या प्रकरणी अजुन एका मुलीने तक्रार केली आहे.

अक्षय श्रीपाद राव (27 रा. खोडेनगर, आठवण हॉटेलजवळ, इंदिरानगर) असे संशयिताचे नाव आहे.  पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीएसचे शिक्षण घेतलेला अक्षय एका आयटी कंपनीत कामास आहे.

त्याचे आईवडील दुबई येथे असून, तो एकटाच नाशिकमध्ये राहतो. काही दिवसांपूर्वी 25 वर्षीय युवतीस विवाहाचे आमिष दाखवून घरी बोलावले होते.

यावेळी तिची अश्लील छायाचित्रे काढून त्याने ती सोशल मीडियावर व्हायरल केल्याची तक्रार मुलीने केली होती. या प्रकरणी त्यास अटक करण्यात आली होती. 13 जून रोजी अटक केल्यानंतर  न्यायालयाने त्यास 16 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.  दरम्यान, गुरूवारी (दि.15) या प्रकरणात आणखी एका युवतीने पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली आहे.

मुळ नाशिकची ही युवती मुंबईत नोकरी करते. एमबीएचे शिक्षण घेतलेल्या युवतीशी अक्षयने प्रेमसंबंध प्रस्थापीत करीत तीलाही लग्नाचे अमिष दिले होते. दरम्यान भेटी गाठीमध्ये त्याने मुलीचे अश्लिल फोटोग्राफ्स काढले होते.

परंतु दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने  लग्न करण्यास नकार दिला होता. अखेर मुलीने नाशिक सोडले. मात्र, अक्षय सतत फोन करून तिला पुन्हा घरी बोलवत होता. त्यास पीडीत मुलीने स्पष्ट नकार दिल्यानंतर अक्षयने आपल्याकडील युवतीचे अश्लिल फोटोग्राफ्स तब्बल 145 पॉर्न साईटसवर अपलोड केले. याची माहिती समजताच धक्का बसलेल्या मुलीने नाशिक पोलीसांकडे धाव घेतली.

पहिल्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अक्षयचा लॅपटॉप, मोबाईल व इतर महत्वाचे पुरावे हस्तगत केले होते. त्याची तपासणी करताना 145 पेक्षा अधिक पॉर्न साईटवर हे फोटो अपलोड केल्याचे समोर आले यासह अनेक गंभीर बाबी स्पष्ट झाल्या आहेत.  दरम्यान हे फोटो या पॉर्न साईटवरून काढून टाकण्यासाठी नाशिक पोलीसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी इंडियन कम्प्युटर इर्मजन्सी रिसपॉन्स टीमची (सीईआरटी-इन) मदत घेतली जात आहे. हा मजकूर हटवण्यासाठी स्थानिक न्यायालयाचा आदेश महत्वाचा असतो. त्यादृष्टीकोनातून पोलिसांनी आज अर्ज सादर केला आहे.

कोर्टाचा आदेश मिळाल्यानंतर तक्रारीची एक प्रत सोबत जोडून ती माहिती इंडियन कम्प्युटर इर्मजन्सी रिसपॉन्स टीमकडे (सीईआरटी-इन) पाठवण्यात येईल. ही संस्था माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अख्यात्यारित येते. कोर्टाच्या आदेशानुसार नोडल एजन्सी म्हणून सदर संस्था संबंधीत वेबसाईट्सवरील फोटोग्राफ्स किंवा व्हिडीओ काढून टाकण्याचे व्हर्चुअल आदेश संबंधीत वेबसाईट्सला देते. त्यानंतर हे फोटो काढून टाकले जातील असा विश्वास सायबर पोलीस ठाण्यातील सुत्रांनी व्यक्त केला आहे.

 

LEAVE A REPLY

*