गोंदे दुमाला फाट्यावर अपघात; मुंबई येथील चार जण गंभीर जखमी

0

बेलगाव कुऱ्हे। वार्ताहर : नाशिक मुंबई महामार्गवरील गोंदे दुमाला फाट्यावर रात्री ११. ४५ वाजेच्या सुमारास स्विप्ट कारने मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

अधिक माहिती अशी की, महामार्गावरून जाणाऱ्या स्विप्ट कार क्रमांक एम. एच ०१.१५४३ या वाहनाने ट्रक क्रमांक एम. एच. ०४. एफ. यु .८८५४ या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. त्यात मुंबई येथील रावसाहेब पाटिल वय (४५), विजया रावसाहेब पाटिल वय (३२), प्रिती रावसाहेब पाटिल वय (१३), राजेस आदित्य प्रसाद पांडे वय (३०) रा मुंबई हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती समजताच जगतगुरु नरेंद्रचार्य संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक निवृत्ती गुंड यांनी यांनी सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

LEAVE A REPLY

*