Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू

Share

घारगाव । वार्ताहर : पुणे-नाशिक महामार्गावर मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास डोळासणे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. समाधान विनायक बागुल (रा. हनुमान नगर, सोनजांब नाशिक) असे मयताचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, नाशिक सोनजांब येथील बागुल हे नाशिककडून पुण्याकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. त्यांच्या चेहऱ्यावसह कंबरेवरील भागाचा अक्षरशा चेंदामेंदा झाला. घारगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

दुसरी घटना अशी कि, पुणे- नाशिक महामार्गावरील कर्जुले शिवारात आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास मालट्रक पलटल्याने विचित्र अपघात झाला. मालट्रक रस्त्यावरच आडवा झाल्याने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कर्जुले पठार ते गुंजाळवाडी फाटा यादरम्यान सर्व्हिस रोडवरून सुरू आहे.

पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या मालट्रकचा (एमएच १४ बी 5223) टायर फुटल्याने सदरचा मालट्रक रस्त्यावरच आडवा झाला. त्यामुळे पुणे- नाशिक रस्त्यावरची वाहतूक कर्जुले पठार ते गुंजाळवाडी दरम्यान सर्व्हिस रोडवर सुरू आहे.

अपघाताची माहिती समजताच घारगाव पोलीस व डोळासणे महामार्ग पोलीस पोलिसांनी घटनास्थळी धाव  घेतली.  या अपघातांमुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तासापासून सर्व्हिस रोडवरून सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!