नाशिक परिक्षेत्रात सरासरी ३५० अपघात

महामार्गांवर दीडशे अपघाती मृत्यू

0
नाशिक | दि. ९ प्रतिनिधी –  महामार्गावर दारू पिवून अपघात होत असल्याचे निष्कर्ष काढून सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांवरील ५०० मिटरच्या आतील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. देशभरात रस्ते अपघातात मृत्यू पडणार्‍यांची संख्या ६ लाख आहे.
राज्यात १२ हजार मृत्यू वर्षभरात होतात तर नाशिक परिक्षेत्रातील चार जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १५० मृत्यू होत असल्याचे महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. चालू वर्षी अवघ्या तीन महिन्यात १५३ अपघातात ६० मृत्यू झाले आहेत

पूर्वीच्या तुलनेत महामार्गांची आताची स्थिती अतिशय उत्तम असतानाही अपघातांची संख्या मात्र वाढत चालली आहे. पूर्वी दुहेरी असलेले राज्य व राष्ट्रीय महामार्ग आता चौपदरी झाले आहेत. यामुळे वाहनांच्या वेगातही दुपटीने वाढ झाली आहे.

अपघात होण्याच्या कारणांमध्ये प्रामुख्याने अतिवेग हेच कारण असल्याचे महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वाहनांचा १०० पेक्षा अधिक असलेला वेग, लेन कटींग, वाहन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, रॅश ड्रायव्हिंग, महामार्गालगतच्या गांवाजवळील रोड क्रॉसिंग, रस्त्यात वाहने उभी करणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न वापरणे व सर्वात शेवटी दारू पिवून वाहन चालविणारे या कारणांनी महामागार्ंवरील अपघात वाढले आहेत.
नाशिक विभागातील नाशिकसह, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यतील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१६ या वर्षात ३२५ अपघात झाले आहेत. यामध्ये १२४ जणांचा मृत्यू झाला असून ५८६ जण गंभीर जखमी झाले आहेत. २०१५ च्या तुलनेत यामध्ये घट दिसत असली तरी चालू वर्षी अवघ्या तीन महिन्यात नाशिक विभागात १५३ अपघात झाले असून यामध्ये ६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९९ जण जखमी झाले आहेत.
या अपघातांत पुणे- नाशिक महामार्ग आघाडीवर आहे. मागील वर्षभरात या मार्गावर १०४ अपघातात ३५ जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर १८२ जण गंभीर जखमी झाले आहेत. चालू वर्षीही २६ अपघातात ९ मृत्युमुखी तर ४९ जण जखमी होण्याचे प्रकार या मार्गावर घडले आहेत. या खालोचाल धुळे मालेगाव मार्गाचा क्रमांक लागतो.

जनजागृतीवर भर…
महामार्गांवरील अपघात कमी करण्यासाठी व त्यांना तात्काळ मदत पुरविण्यासाठी महामार्ग पोलीस कार्यरत आहेत. आम्ही ९९ टक्के रिप्लेक्टर बसविण्याची मोहीम पुर्ण केली आहे. तसेच हेल्मेट व सीटबेल्ट वापर याबाबत सतत जागृती करण्यात येत आहे. महामार्गावर होणारे सर्वाधिक अपघात हे अतिवेगाने होत आहे. हे रोखण्यासाठी आमच्या उपाययोजना सुरू आहेत. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण आणून स्वतःसह इतरांच्या जीवनाची काळजी घ्यावी.
– सुभाष पवार, प्रभारी उपअधिक्षक, महामार्ग पोलीस

LEAVE A REPLY

*