Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकच्या कुत्र्यांचा जानोरीत सुळसुळाट; अपघातही वाढले

Share

जानोरी : दहावा मैल ते जानोरी दरम्यान कुत्रा आडवा गेल्याने झालेल्या अपघातात दोन मजुर गंभीर जखमी झाले आहेत. दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास मोहाडीवरून दहावा मैलावर रिक्षा क्र. एम.एच.१५ ए.के. ५३७० ही प्रवासी घेवून जात असतांना खडतर रस्त्यावरून खड्डे चुकवत जात असताना अचानक कुत्रा आडवा आल्याने रिक्षा पलटी झाली. त्यातील एक मजुर दांपत्य गंभीर जखमी झाले. अपघातात इतके गंभीर झाले की त्यांना नावही सांगता येत नव्हते. त्यांना तात्काळ मेडीकल कॉलेज आडगाव येथे पाठविण्यात आले.

दरम्यान नाशिकपासून महामार्गावर असणाऱ्या दहाव्या मैलावर हा अपघात घडला. दहावा मैल ते जानोरी या मार्गावर रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

तसेच या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून पालिका प्रशासन शहरातील सर्व मोकाट कुत्र्यांना पकडुन पालिका हद्दीच्या बाहेर सोडतात. परंतु या कुत्र्यांना अगोदरच आजाराने ग्रासले असल्याने ग्रामीण भागातील याचा अन्य कुत्र्यांशी संबध येत आहे. त्यामुळे इतरही कुत्रे या आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. तसेच जानोरी व जऊळके-दिंडोरी या गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून संबंधितांना वेळीच दखल घ्यावी अशी मागणी जानोरी व जऊळके-दिंडोरी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

सदरील संसर्गजन्य कुत्रे गावात असून माणसांच्या वर्दळीच्या ठिकाणी वावरत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य तर धोक्यात येणार नाही ना? अशी शंका ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत आहे.

महानगरपालिकेने शहरातील रोगराई दुर करण्यासाठी राबवलेले धोरण हे ग्रामीण भागातील जनतेवर अन्याय करणारे आहे. रोगसद्रृश कुञी जानोरीत वर्दळीच्या ठिकाणी वावरताना दिसतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही याविषयी महापालिकेस निदर्शनास आणून दिल्यानंतरही संबंधित प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष न देता दुर्लक्षच करते ही एक शोकांतिकाच मानावी लागेल. आतातरी संबंधित प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दखल घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
-गणेश तिडके, उपसरपंच, जानोरी

नगरपालिका हद्दीतील मोकाट कुञी राञीच्या सुमारास शिवारातील निर्जन स्थळी सोडले जातात. महानगरपालिका हद्दीतील दुखणे ग्रामीण भागातील जनतेच्या माथी मारण्याचे काम नगरपालिकेचे चाललेली आहे. परंतू शहरी जनतेला न्याय देत असताना ग्रामीण जनतेवर अन्याय करण्याचे धोरण ही एक खेदाचीच बाब म्हणावे लागेल. सबंधित प्रशासनाला याविषयी ग्रामपंचायतीमार्फत पञव्यवहारही केला जाईल. तरीही संबंधितांनी याकडे त्वरित व गांभीर्याने लक्ष केंद्रित करून ग्रामीण जनतेलाही न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
– विष्णुपंत काठे, जानोरी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!