Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : त्र्यंबक नाका सिग्नलवर पाच वाहनांत विचित्र अपघात

Share

नाशिक : त्रंबक नाका सिग्नलवर आज दुपारी सव्वा तीन सुमारास महामंडळाच्या बसने चार वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघात महामंडळच्या बसने दोन दुचाकीसह इतर दोन चारचाकी वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात एक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.

दरम्यान, बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे तासाभरापासून वाहतूक खोळंबली असून ट्रॅफिक पोलीस वाहतूक सुरळीत करीत आहेत. ही बस रावेर ते ठाणे या मार्गावरील असून बदली ड्रायव्हर गाडी घेऊन निघाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी परिवहन महामंडळाचे अधिकारी दाखल झाले असून घटनेची तपासणी करत आहेत. बस आणि नागरिक सरकारवाड्यात पोहचले असून पुढील तपास सरकारवाड्याचे पोलिस अधिकारी करत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!