Friday, April 26, 2024
Homeनाशिक'या' दिवशी ठरणार मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष

‘या’ दिवशी ठरणार मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष

नाशिक | प्रतिनिधी

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला हाेणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या परिसरात साहित्य संमेलन होणार असून येत्या २४ तारखेला संमेलनाध्यक्ष घाेषित केले जाणार आहे.

- Advertisement -

२३ जानेवारी रोजी नाशिक येथे संमेलन मार्गदर्शन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत संमेलनाच्या आयोजनाविषयी चर्चा होईल. तसेच दि. २४ रोजी नाशिक येथेच एक बैठक होणार असून, यामध्ये साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची रचना आणि संमेलनाध्यक्ष याचा निर्णय जाहीर केला जाईल.

पुण्यातील सरहद संस्थेने मे महिन्यात साहित्य संमेलन घेण्याचे सांगितले होते, परंतु महामंडळाचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे आहे.

प्रत्येक वर्षीचे अनुदान त्याच वर्षी वापरले गेले पाहिजे, असे वाटते. त्यामुळे पुन्हा अनुदानाचा प्रश्न निर्माण होऊ नये, हे देखील प्रस्ताव नाकारण्याचे एक कारण होते. याशिवाय कोरोनामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी दिल्ली सुरक्षित ठिकाण नाही.

त्यामुळे दिल्लीला संमेलन घेण्यास महामंडळ उत्सुक नव्हते, असे ठाले पाटील यांनी सांगितले. नाशिकमध्ये याआधी १९४२ व २००५ असे दोन वेळा संमेलन भरविण्यात आले. तिसऱ्यांदा संमेलन आयोजनाचा मान नाशिकला मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या