Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

टायपिंग परीक्षेचा 60 टक्के निकाल; 90 हजार विद्यार्थी उत्तीर्ण

Share

नाशिक । राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या संगणक टायपिंग परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. तीस शब्द प्रतिमिनिट परीक्षेत उत्तीर्णांचे प्रमाण 60 टक्के; तर चाळीस शब्द प्रतिमिनिटसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्णांचे प्रमाण 60.43 टक्के असल्याची माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

परीक्षा परिषदेतर्फे जुलै ते ऑगस्ट महिन्यात संगणक टायपिंगची परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची ऑनलाइन प्रिंट घेता येणार आहे. इंग्रजी, मराठी व हिंदी या तीन विषयांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. 30 शब्द प्रति मिनिटसाठी एक लाख सहा हजार 23 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 63 हजार 685 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तर, 82 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. एकूण निकाल 60 टक्के लागला आहे. यासोबतच 40 शब्द प्रति मिनिट परीक्षेसाठी 43 हजार 613 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 26 हजार 359 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत; तर 103 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. एकूण निकाल 60.43 टक्के लागला आहे.

निकाल जाहीर झाल्यापासून दहा दिवसांच्या आत परीक्षार्थी गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. अधिक माहिती ुुु.ाीलर्शिीपश.ळप या वेबसाइटवर उपलब्ध आहे, असे परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!