Friday, April 26, 2024
Homeनाशिकशेअर मार्केटच्या नावाखाली नाशकात ६४ लाखांना चुना

शेअर मार्केटच्या नावाखाली नाशकात ६४ लाखांना चुना

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शेअर मार्केट (share market) कंपनीचे प्रमाणपत्र (Company Certificate) दाखवत दोन कंपन्यांचे ब्रोकर (Broker) असल्याचे सांगत फिर्यादीसह तेरा सहकारी गुंतवणूकदारांना तब्बल ६४ लाखांना गंडा घातल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे….

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, संशयित राहुल शंकरगौडा पाटील (वय ३५, रा ६५८ बसवन नगर, गौडवाड, बेळगाव, कंग्राळी बीके याने फिर्यादी संजय सदानंद बिन्नर यांच्यासह १३ जणांचा विश्वास संपादन करत त्यांना आपण शेअर मार्केटमधील त्याचे अक्युमेन व गुडविल या शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखवले.

तसेच या दोन्ही कंपनीचे ब्रोकर असल्याचे सांगत ७५ लाख ४५ हजार रुपये उकळले. त्यापैकी ११ लाख १ हजार ५९७ रुपये त्याने परत केले. दरम्यान, उर्वरित रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक न करता पाटील पळून गेला. सहकारी गुंतवणूकदारांशी त्याने संपर्क ठेवला नाही, तसेच नाशिकमधूनही तो कुठेतरी निघून गेला.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस (Mumbai Naka Police Station) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या