Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

राज्य मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून ‘द लास्ट व्हाईसरॉय’ प्रथम

Share

नाशिक | प्रतिनिधी
59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून अथर्व ड्रॅमॅटिक्स अकॅडमी या संस्थेच्या ‘द लास्ट व्हाईसरॉय’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले. तर ओझरच्या एच.ए.ई. डब्लू.आर.सी रंगशाखा या संस्थेच्या ‘प्रार्थनासूक्त’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. नाट्यसेवा थिएटर्स, नाशिक या संस्थेच्या ‘साधे आहे इतकेच’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले.

नाशिकच्या परशूराम सायखेडकर नाट्यगृहात 15 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधित या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत एकुण 18 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शाम अधटराव , संदीप देशपांडे, व किर्ती मानेगांवकर यांनी काम पाहीले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.

स्पर्धेचा निकाल असा-
दिग्दर्शन – प्रथम-महेश डोकफोडे(द लास्ट हाईसरॉय), द्वितीय -हेमंत सराफ (प्रार्थनासुक्त) प्रकाशयोजना-प्रथम-कृतार्थ कंसारा(द लास्ट व्हाईसरॉय), द्वितीय-आकाश पाठक(प्रार्थनासूक्त), नेपथ्य-प्रथम मंगेश परमार(द लास्ट व्हाईसरॉय), द्वितीय गणेश सोनावणे(काठपदर), रंगभूषा-प्रथम-माणिक कानडे(द लास्ट व्हाईसरॉय), द्वितीय- सुरेश भोईर(ड्रीम युनिवर्स). उत्कृष्ट अभिनय रौप्य पदक – अक्षय मुडवदकर, पूनम पाटील( द लास्ट व्हाईसरॉय)

यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे-
पूनम देशमुख (नाटक-साधे आहे इतकेच), प्राजक्ता भांबारे(भोवरा), मनिषा शिरसाठ(काठपदर), भावना कुलकर्णी(प्रेमा तुझा रंग कसा), पल्लवी ओढेकर(कहाणी मे ट्विस्ट), समाधान मुर्तडक(अरे देवा), संदेश सावंत (प्रार्थनासुक्त), विक्रम गवांदे(वारुळ), आदित्य भोंम्बे(साधे आहे इतकेच) कुंतक गायधनी(अंधायुग)

हे नाटक लिहण्यासाठी मला साडे तीन वर्ष लागली. नाटकासाठी एकुण 13 पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला आहे. आम्ही सर्व कलाकार गेल्या सहा महिन्यापासून नाटकाची तालीम करत होतो. त्यामुळे नाटकाला मिळालेले ंहे यश संपूर्ण टीम चे आहे. रंगभूमीची जर प्रामाणिक सेवा केली तर यश हमखास मिळते याचा प्रत्यय आलां आहे. कारण हे माझे तिसरे नाटक असून माझी तीनही नाटके नंबरात आली आहे.
-महेश ककडोकफोडे- लेखक/ दिग्दर्शक ‘द लास्ट व्हाईसरॉय

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!