प्रशासनाकडून 55 कोटी दुष्काळ निधीचे वाटप

0

नाशिक । प्रतिनिधी
राज्य शासनाकडून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 85 कोटींचा निधी देण्यात आला होता. त्यापैकी जिल्हा प्रशासनाने दुष्काळी तालुक्यांना 55 कोटी निधीचे वाटप केले आहे. जिल्ह्याला 417 कोटी निधीचा शासनाने मंजूर केला आहे.

जिल्ह्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती पहायला मिळत आहे. अनेक तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष असून, चारा टंचाईची परिस्थिती आहे. ही गंभीर परिस्थिती बघता शासनाने जिल्ह्यातील आठ तालुके व 17 मंडळांमध्येे दुष्काळ जाहीर केला आहे. जिल्ह्यात अंदाजे तीन लाख शेतकरी दुष्काळग्रस्त असण्याची शक्यता आहे. दुष्काळ निवारणासाठी शासनाने जिल्ह्याला 417 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

त्यापैकी पहिल्या टप्प्यात 85 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने वेगाने चक्र फिरवत दुष्काळ ग्रस्त तालुक्यांना आर्थिक मदत उपलब्ध कनरू दिली. सध्यस्थितीत 55 कोटी निधीचे वाटप करण्यात आले आहे.े दुष्काळग्रस्त भागात लोकाना दिलासा म्हणून टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शासनाकडून उर्वरित निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*