Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : राज्यातील ५२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ९ जणांना बढत्या

Share

नाशिक : राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक /पोलीस उप आयुक्त या संवर्गातील अधिकारी वर्गाच्या बदलीने /पदोन्नतीने पदस्थापना देण्यात येत आहे. शहरात कार्यरत वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस उपआयुक्त माधुरी कांगणे, मालेगावचे अपर पोलीस आयुक्त निलोत्पल, अपअधीक्षक आर. रागसुधा यांचीही बदली करण्यात आली आहे.

राज्य गृह विभागाने राज्यातील ५२ पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. शहरातील पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे (केदार) यांची पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण अधीक्षक पदी शहरातच बदली तर मालेगावचे अपर पोलीस आयुक्त निलोत्पल यांची पोलीस उपायुक्‍त म्हणून नागपूर शहरात आणि मालेगावचे साहाय्यक पोलीस अधीक्षक रागसुधा यांना पदोन्नती मिळली असून त्यांची अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून परभणी येथे असणार आहे.

विजय जी. मगर ( पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नाशिक ते पोलीस उपायुक्त सोलापूर शहर), संदीप घुगे (पदोन्नती- साहाय्यक पोलीस अधीक्षक ते अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव,ग्रामीण), विजय एम खरात (पोलीस अधीक्षक -प्रशासन ते पोलीस उपायुक्त, नाशिक शहर), नंदकुमार टी ठाकूर ( पोलीस अधीक्षक / उप संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ते पोलीस उप आयुक्त, बृहनमुंबई), रमेश नागनाथ चोपडे (सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर ते पदोन्नती- उप आयुक्त, राज्यगुप्तवार्ता विभाग नाशिक), जयश्री ज्ञानदेव देसाई (पोलीस उप अधीक्षक, टी.आर.टी.आय. सातारा ते पदोन्नती- पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी,नाशिक), चंद्रकांत खांडवी ( उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण ते पदोन्नती-पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक) अशा पद्धतीने शहरातील बदल्या तसेच बढत्या मिळाल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!