वृक्षलागवडीत नाशिक राज्यात अव्वल; 45 लाख 29 हजार रोपांची लागवड

0
नाशिक । शासनाच्या 4 कोटी वृक्षलागवडीच्या महत्त्वाकांक्षी योजनेत यंदा नाशिक विभागाने बाजी मारली असून 20 लाख उद्दिष्ट असताना तब्बल 45 लाख 29 हजार वृक्षलागवड विभागात करण्यात आली. 43 लाख वृक्षलागवडीसह चंद्रपूर जिल्हा दुसर्‍या स्थानावर आहे तर 30 लाख वृक्ष लावून नगर जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. शासनाने यंदा 1 ते 7 जुलैदरम्यान 4 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते.

त्यात नाशिक जिल्ह्यासाठी 20 लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु उद्दिष्टापेक्षा दुप्पट म्हणजे 40 लाख 29 हजार वृक्ष लावून नाशिक विभागाने कमाल केली आहे. नाशिक विभागातील नाशिक आणि नगर जिल्हा मिळून एकूण 76 लाख 9 हजार 564 वृक्षांची लागवड करण्यात आली.

शासनाच्या विविध विभागांबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत विभाग, वनविकास विभागाचे महाव्यवस्थापक आदी विभागांनीही याकामी महत्त्वाचे योगदान दिले आहे. याशिवाय विविध पर्यावरणवादी संस्था, निसर्ग मित्र, सामान्य नागरिक यांनीही वृक्षलागवडीसाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यानेच हे सिद्ध होऊ शकले. नाशिक जिल्ह्यातील वनविभागाच्या जमिनीबरोबरच महापालिका क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्रावर ही वृक्षलागवड करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात या हंगामात एकूण 5 कोटी 43 लाख 35 हजार इतकी वृक्षलागवड झाली आहे.
वृक्षलागवड उपक्रमासाठी वनविकास महामंडळाच्या कार्यालयानेही मदत केली असून महामंडळातर्फे संपूर्ण राज्यभर 16 लाख रोपांची लागवड करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात 11 लाख 89 हजार वृक्ष लावण्यात आले.

LEAVE A REPLY

*