Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शेतकरी सन्मान योजनेसाठी 4.5 लाख शेतकरी पात्र

Share

नाशिक । प्रतिनिधी
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची दोन एकरची अट शिथील केल्यानंतर जिल्ह्यातील साधारणत: चार लाख पन्नास हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने यापुर्वी तीन लाख शेतकर्‍यांची नावे संकेतस्थळावर अपलोड केली आहे. येत्या 30 जून पर्यत उर्वरीत लाभार्थ्याची नावे अपलोड करण्याची डेडलाईन शासनाकडून देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरु केली. त्यानूसार दोन हेक्टर शेती असलेल्या अल्प भूधारक शेतकर्‍यांच्या बॅक खात्यावर वर्षाला सहा हजार रुपयांचे अनुदान जमा केले जाणार होते. 1 फेब्रुवारी 2019 पासून ही योजना अंमलात आली.जवळपास साधारणत: तीन लाख शेतकर्‍यांना सहा हजारापैकी दोन हजारपैकी पहिल्या टप्प्यातील दोन हजारांचे अनुदान मिळाले.

सत्तेत आल्यानंतर केंद्र शासानाने या योजनेचे अट शिथील करत सरसकट शेतकर्‍यांना ही योजना लागू केली. अट शिथील केल्याने जिल्ह्यातील लाभ्यार्थ्यांची संख्या ही साडेसात लाखांच्या घरात जाण्याची शक्यता होती. मात्र, कागदपत्राच्या तपासणी नंतर साडेचार लाख शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरत आहे. या पुर्वी तीन लाख शेतकर्‍यांची नावे व माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. अट शिथील केल्यानंतर लाभार्थ्यांच्या संख्येत दीड लाख नवीन शेतकर्‍यांची भर पडली आहे.

येत्या 30 जून पर्यंत उर्वरीत शेतकर्‍यांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याची डेडलाईन जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी गावातील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवकांकडे त्यांचे बँकेच्या पासबुकचे पहिले पान, आधार कार्डची झेरॉक्स जमा करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, नव्या लाभार्थ्यांना पुढील दोन टप्प्यातील चार हजारांचे अनुदान मिळेल.

यांना मिळणार नाही लाभ
– शेती आहे पण जे सरकारी घटनात्मक पदांवर आहेत,
– जे आयकर दाते आहेत आणि ज्यांची पेन्शन दहा हजारांच्यावर आहे. -डॉक्टर, इंजिनीअर्स, वकील यांनाही ही योजना लागू नाही.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची अट शिथील केल्यनांतर जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या साडेचार लाख इतकी आहे. दिवसाला 17 हजार शेतकर्‍यांची माहिती संकेतस्थळावर अपलोड केली जात आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!