Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

वर्षभरात २९ हजार नाशिककर‘पासपोर्टधारक’; युवावर्गाचा कल अधिक

Share

नाशिक | भारत पगारे
मागील दोन वर्षात नाशिकची देशातील इतर शहरांशी कनेक्टीव्हिटी वाढली असून शहरात पासपोर्ट काढणार्‍यांच्या संख्येतदेखील मोठी वाढ झाली आहे. मागील एक वर्षात तब्बल 29 हजार नाशिककरांंनी पासपोर्ट काढला आहे. मुंबई, पुणे या शहरांच्या तुलनेत नाशिककर पासपोर्ट काढण्यात आघाडीवर आहेत. हवाई क्षेत्राला पंख लाभल्याने व विविध कारणांसाठी परदेशात जावे लागत असल्याने नाशिककरांची विमान प्रवासाला पसंती मिळत आहे.

मागील काही वर्षापासून ठप्प पडलेल्या नाशिकच्या विमानसेवेने टेक ऑफ घेतले. एअर इंडीया, स्पाईस जेट, जेट एअरवेज, इंडीगो या सारख्या विमान कंपन्यांनी नाशिकसाठी विमानसेवा दिली. केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत दिल्ली, मुंबई, हैदराबाद, हिंडन, अहमदाबाद या शहरांशी ‘नाशिक’ हवाई मार्गाने जोडले गेले आहे.

त्यासोबतच परदेशात शिक्षण किंवा पर्यटन करण्याचा कलही वाढला आहे, त्यातून नाशिकमधून विमान प्रवास करणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली असून पासपोर्ट काढणार्‍यांचे प्रमाणही वाढत आहे. नाशिकरोड येथील कार्यालयात ऑनलाईनद्वारे पासपोर्टसाठी अर्ज केले जातात. तेथून गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी पडताळणीसाठी हे अर्ज ऑनलाईनद्वारे शहर पोलीस आयुक्तालयातील पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयात पाठविले जातात.

येथे साधारणत: दिवसाला सव्वाशे ते दिडशे अर्ज पडताळणीसाठी येतात. येथून ‘ग्रीन’ सिग्नल मिळाल्यानंतर पासपोर्ट काढण्याचा मार्ग मोकळा होतो. मागील वर्षभरात 28 हजार 852 नाशिककरांनी पासपोर्ट काढले आहेत.

त्यामध्ये शिक्षणासाठी देशात व परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरी, उद्योग व व्यवसायासाठी परदेशात जाणारे लोक तसेच पर्यटन व धार्मिक यात्रेसाठी जाणे या कारणांंसाठी पासपोर्ट काढले जातात. दिवसेंदिवस ही संख्या वाढत असून चालू वर्षाच्या जूनपर्यंत 12 हजार 217 नाशिककरांनी पासपोर्ट काढला आहे.

ओळखपत्रासाठी पासपोर्ट
पूर्वी ओळखपत्र म्हणून शासकीय कामकाजाच्या ठिकाणी मतदान कार्ड, वाहन परवाना, आधारकार्ड आदींचा वापर केला जात होता. पूर्वी पासपोर्ट काढणे हे जणू अग्निदिव्यच होते. मात्र आता पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीमुळे सुलभ झाली आहे. अर्ज केल्यानंतर अवघ्या 21 दिवसांंत पासपोर्ट मिळतो. शिवाय त्यासाठी दिड ते दोन हजार रूपये खर्च येतो. त्यामुळे देखील आता पासपोर्ट काढण्याकडे विशेषत: युवा पिढीचा कल आधिक आहे.

राज्यात नाशिक टॉपर
राज्यात पासपोर्ट परवानगी देण्यात नाशिक शहर अव्वल आहे. पेपरलेस कामकाजामुळे पडताळणीचे काम सोपे झाले आहे. मागील काही वर्षात नाशिक पोलीस आयुक्तालयाने शहारातील 1 लाख 42 हजार 471 नागरीकांच्या पासपोर्टसाठी प्राप्त अर्जांना ग्रीन सिग्नल दिला आहे.

-भरतसिंग पराडके, पोलीस निरिक्षक, पारपत्र शाखा.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!