#Video # येवल्यात दिवाळीवर दुष्काळाचे सावट : घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात

बाजारपेठेत सामसुम : व्यापारी हवालदिल

0
 राजेंद्र शेलार | येवला :  येवला  तालुक्यात ऐन दिवाळीच्या दिवशी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात फेरफटका मारला असता अत्यंत विदारक चित्र दिसून येत आहे.

ग्रामीण भागात गावागावात आठवडे बाजार भरतो आज विखरणी येथील आठवडे बाजार असून बाजारात अत्यंत तुरळक प्रमाणात गर्दी दिसून येत आहे दिवाळीच्या दिवसात मालाचा चांगला खप होईल या आशेतून व्यापाऱ्यांनी विविध प्रकारच्या सामानाची खरेदी करून ठेवली मात्र आता मालाला उठाव नसल्याने आता करावे तरी काय असा प्रश्न व्यापारी वर्गाला सतावतो आहे.

दरवर्षी सासुरवासिनी मोठ्या प्रमाणात माहेरी येत असतात मात्र यावर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी महिलांनी सासरी राहणेच पसंद केल्याचे दिसून येत आहे. तर पाण्याअभावी मामाच्या गावाला जाण्याऐवजी घरीच थांबून आईला दूर विहिरीवरून पाणी आणण्यास मदत करत असल्याचे चित्र बाळापूर येथे दिसुन आले.

विहिरीत अत्यंत खोलवर पाणी असून अक्षरशः विहिरीतून पाणी ओढताना जीव जाईल की काय अशी भीती वाटत असतानाच अगदी नाईलाजाने पाणी ओढावे लागत असल्याचे दिसून आले.

दरवर्षी कापड बाजारात मुलांसाठी कपडे तर बांगड्या भरण्यासाठी बांगड्याच्या दुकानात महिलांची गर्दी उसळत होती यावर्षी मात्र तुरळक गर्दी दिसून येत आहे

विखरणी,विसापूर, बाळापूर,गुजरखेडे, आडगाव रेपाळ व परिसरात दुष्काळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे त्यामुळे गावे ओसाड पडल्याचे चित्र दिसत आहे एकीकडे हे चित्र दिसत असताना दुभदुभत्या गायी म्हशीसह शेतीउपयोगी जनावरांनाही बाजाराचा रस्ता दाखवण्याची वेळ बळीराजावर आली आहे यापूर्वी असा दुष्काळ कधीही पाहिला नसल्याची प्रतिक्रिया जुनेजानेते व्यक्त करतात.

LEAVE A REPLY

*