Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

समृद्धी महामार्गावर 150 कि.मी. वेगाने वाहने धावणार

Share

नाशिक । प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावरून 150 कि. मी. वेगाने धावण्याची परवानगी वाहनांना असणार आहे. त्यामुळे या महामार्गालगत खासगी थांबे, हॉटेल्स व इतर बांधकामांना परवानगी मिळण्याची शक्यता धूसर आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या महामार्गावर 28 ठिकाणी अ‍ॅमेनिटीज् उपलब्ध करून देणार आहे.

प्रत्येक ठिकाणी ट्रक टर्मिनल्स, पेट्रोल पंप, पार्किंग व्यवस्था, 30 एकर जागेत फूड प्लाझा, हॉटेल्स, ट्रामा सेंटर्स, बस-बे आदी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. महामार्गावर 24 ठिकाणी इंटरचेंज असणार आहे. त्या इंटरचेंजपासूनच महामार्गावर प्रवास करण्यासाठी वाहनाला जाणे शक्य होईल. इतरत्र कुठूनही महामार्गावर वाहन घेऊन जाता येणार नाही.

नॅशनल हायवेलगत 75 मीटरवर बांधकाम परवानगी आहे. परंतु समृद्धी महामार्गाच्या दुभाजकापासून ज्याठिकाणी एमएसआरडीसीने नियोजन केलेली 28 ठिकाणे आहेत, तेथेच प्रवासी सुविधा असतील. त्यामुळे दुभाजकापासून कोणत्याही अंतरावर खासगी बांधकामे होणे अवघड असणार आहे.

दरम्यान, वर्षभरानंतर अ‍ॅडव्हान्स इंटेलिजन्स ट्रॅफिक सिस्टिम मॅनेजमेंटचे काम सुरू करण्यात येणार असून महामार्गावर 50 हून अधिक उड्डाणपूल असणार आहेत.

एक हजार हेक्टरमध्ये टाऊनशिप
18 ठिकाणी 1 हजार हेक्टरमध्ये टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. 18 ठिकाणे नोटीफाईड करण्यात आली आहेत. 7 ठिकाणी लॅण्डपुलिंगच्या धर्तीवर भूसंपादन करण्यात येणार आहे. तसेच 7 ठिकाणी 3 कन्सल्टंट काम करीत आहेत. त्या ठिकाणांचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) कन्सल्टंट तयार करणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!