Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

दहावीतही मुलीचं हुश्शार ! राज्याचा निकाल ७७. १० %

Share

नाशिक : यंदाचा दहावीचा निकाल लागला असून बारावीनंतर दहावीतही मुलीचं सरस ठरल्या आहेत. हा निकाल महाराष्ट्र्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

आज दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती दिली आहे. यंदा राज्याचा १० वीचा निकाल ७७. १० % लागला आहे. तर नाशिक जिल्ह्याचा ७७. ५८% लागला आहे.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

https://www.deshdoot.com/click-here-for-10th-result-breaking-news/

 

यंदा दहावीच्या परीक्षेत एकूण १६ लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात १२% ची घट झाली आहे. यंदाच्या दहावीच्या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल ८२. ८२% लागला आहे तर मुलांचा निकाल ७२. १२% लागला आहे. राज्यातील विभागानुसार लागलेल्या निकालात यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला असून नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

असा राज्याचा निकाल :

कोकण- ८८. ३०%

मुंबई- ७७. ०४%

पुणे- ८२. ४८%

नाशिक- ७७. ५८%

लातूर- ७२. ६७ %

अमरावती- ७१. ९८%

औरंगाबाद- ७५. २०%

नागपूर- ३७. ८७%

कोल्हापूर- ८६. ५८%

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!