Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नव्या अभ्यासक्रमानुसार दहावी अनुत्तीर्णांची परीक्षा होणार

Share

नाशिक : प्रतिनिधी
दहावीच्या अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून बदल केल्यामुळे या वर्षी जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांना शेवटची संधी देण्यात आली होती.

त्यामुळे मार्च 2019 च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या जुन्या विद्यार्थ्यांना यापुढील परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रमातील विषय घेऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे प्रसिद्ध केले आहे. मार्च 2019 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना नवीन व जुन्या अशा दोन्ही अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची संधी देण्यात आली होती.

जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची ही शेवटची संधी असल्याचे मंडळाने जाहीर केले होते. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षा देताना आता नवीन अभ्यासक्रमातील विषय घेऊन परीक्षा द्यावी लागणार आहे.

याबाबतचा निर्णय मंडळाच्या परीक्षा समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक विभागीय मंडळानी प्रसिद्ध करावे, अशा सूचनाही राज्य मंडळाने दिल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!