विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडून शहीद निनाद मांडगवणे यांच्या कुटुंबियांना १ लाखांची आर्थिक मदत

0

नाशिक : जम्मू काश्मिर मधील बड़गामध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद जवान निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबियाना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडून १ लाख २ हजारांची आर्थिक मदत नाशिकचे माजी आमदार जयवंतराव जाधव यांची कन्या सुप्रिया जाधव व तिच्या शालेय मैत्रिणीनी आज मांडवगणे कुटुंबियांची भेट घेऊन निनाद यांचे वडील अनिल मांडवगणे, आई सुषमा मांडवगणे आणि मुलगी वेदिता यांच्याकडे सुपूर्द केली.

यावेळी आमदार जाधव यांच्या पत्नी जान्हवी जाधव विद्यार्थिनी कशिश बेन्स, भावना सुंदररमण, सृष्टी भालेराव, सृष्टी होडे, शिवानी जाधव, तेजस्विनी देवरे आदी उपस्थित होते.

जम्मू काश्मिर मधील बड़गामध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद जवान निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबियांची नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांत्वनपर भेट घेतली होती. त्यानंतर त्याच दिवशी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाकडून आदर्श आमदार पुरस्कार देऊन विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना गौरविण्यात आले होते.

या पुरस्काराचे स्वरूप एक्कावन हजार रुपये स्मृती चिन्ह असे होते. त्यावेळी खासदार शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी यामध्ये अधिकचे एक्कावन हजार रुपये समाविष्ट करत १ लाख दोन हजार रुपयांची मदत जाहीर केली होती.

त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे माजी आ.जयवंतराव जाधव यांच्याकडे आर्थिक रकमेचा धनादेश पाठविला होता. त्यानंतर आज आमदार जाधव यांची कन्या सुप्रिया जाधव यांनी आपल्या शालेय मैत्रिणीसोबत मांडवगणे कुटुंबियांची भेट घेऊन सदर रकमेचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केला.

यावेळी सुप्रिया यांनी निनाद यांची मुलीसाठी लिहिलेले पत्र देखील त्यांना दिले. यावेळी सुप्रिया आणि तिच्यासोबतच्या भावना सुंदररमण आणि कशिस बेन्स यांनी शालेय टेनिस स्पर्धेत व विज्ञान प्रदर्शनात मिळालेल्या पारितोषिकाची रक्कम त्यांच्या वतीने मांडवगणे कुटुंबियाकडे सुपूर्द केली.

LEAVE A REPLY

*