भरवीर बुद्रुक येथील कृषी विज्ञान मंडळाला यंदाचा आदर्श शेतकरी गट पुरस्कार

0

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील भरवीर बुद्रुक येथील जय श्रीराम कृषी विज्ञान मंडळाला शासनाचा यंदाचा आदर्श शेतकरी गट पुरस्कार मिळाला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष संजय झनकर यांना नुकताच प्रदान करण्यात आल्याने त्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे. यावेळी व्यासपीठावर आमदार दराडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, प्रकल्प उपसंचालक शिरसाठ, उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

आत्मा अंतर्गत मंडळाची स्थापना झाल्यापासून हे कृषी विज्ञान मंडळ कृषी व विविध सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असून राज्य शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे व त्याचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी मोठे योगदान देत आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे, प्रसार करणे, शेतीपूरक व्यवसायासाठी राज्यात व राज्याबाहेर अभ्यासदौरे राज्य शासनाच्या मदतीने आयोजित करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व शेती साठी पुस्तके पुरवून कृषी वाचनालय चालविले जाते. कुकुट पालन शेळी पालन व दुग्ध व्यवसायासाठी बँकेकडून व शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान कर्ज मिळवून दिले जाते. कृषी अवजारे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे अशी अनेक कामे या मंडळामार्फत केल्याने शासनाने त्यांची दखल घेऊन आदर्श शेतकरी गट पुरस्कार दिला.

याप्रसंगी कृषी गटातील सभासद वाळू झनकर, कृष्णा कांचार, जगन गोडे, बहिरू झनकर, रतन झनकर, कमलाकर झनकर, रावसाहेब जामकर, बाळासाहेब झनकर, शिवाजी झनकर, शरद झनकर, विजय झनकर, गोपाळ झनकर, भगवान जुंद्रे, एकनाथ जुंद्रे, भरत रायकर, संतोष झनकर, गोकुळ झनकर, विजय झनकर, आकाश झनकर, ऋषिकेश झनकर आदी उपस्थित होते.

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून नाविन्यपूर्ण प्रयोग केले. स्वतः बरोबरच इतर शेतकऱ्यांना विकासाचा मार्ग दाखविला. भविष्यात शेतकरी कंपनीची स्थापना करून शेतकऱ्यांसाठी उद्योग उभारून रोजगार उपलब्ध करून आर्थिक उन्नती साध्य करावयाची आमच्या कृषी मंडळाची स्वप्न आहेत.
संजय झनकर, अध्यक्ष कृषी विज्ञान मंडळ, भरवीर बुद्रुक

LEAVE A REPLY

*