Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यातील धरणांत सहा टक्के पाणी शिल्लक

Share

नाशिक । प्रतिनिधी
वळवाच्या पावसाने हजेरी लावली असली तरी मान्सूनची अद्याप प्रतीक्षा असून जिल्ह्यातील मध्यम व छोट्या क्षमतेच्या धरणे कोरडी पडली आहेत. धरणांमध्ये आजमितीला अवघा सहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील काळात दमदार पाऊस न पडल्यास जिल्ह्यात पाणीबाणी उद्भवण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. ते बघता प्रशासनाकडून पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

धरणांचे माहेरघर अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात ‘पाणीबाणी’ निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 24 पैकी 13 धरणे कोरडीठाक पडली असून त्यांमध्ये एक थेंब पाणी शिल्लक नाही. तर दहा धरणांमध्ये दहा टक्क्यांहून कमी जलसाठा शिल्लक आहे.

गतवेळी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकली नव्हती. त्यामुळे जानेवारीपासूनच जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवू लागली होती. जूनमध्ये ही समस्या अधिक तीव्र झाली. जिल्ह्यात पाणीबाणीसारखी परिस्थिती उद्भवली आहे.

धरणांमध्ये अवघा 6 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे जिल्ह्याचा घसा कोरडा पडला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 375 टँकरद्वारे जिल्ह्याची तहान भागवली जात आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होण्यास 15 ते 20 जून उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!