Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

पंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण

Share

गंगटोक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण केलं आहे. यावेळी मोदींसोबत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते. सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी मोदी कालच गंगटोकमध्ये दाखल झाले होते. त्याआधी त्यांनी झारखंडमधील रांची येथे आयुष्यमान भारत या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य योजनेचा शुभारंभ केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सिक्कीम दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी राज्यातील एकमेव विमानतळाचं उद्धाटन केलं आहे. विशेष म्हणजे रविवारी एसआय-8 हेलिकॉप्टरने नरेंद्र मोदी सिक्कीमला पोहोचले. पंतप्रधान मोदी यांनी सकाळीच विमानतळाचं लोकार्पण केलं. या विमानतळाचं काम 2009 मध्ये सुरू झालं असून बांधकाम पूर्ण होण्यास 9 वर्षांचा कालावधी लागला.

हिमालयाच्या पर्वतरांगातील सिक्कीम राज्याला आज पहिलं विमानतळ मिळालं आहे. देशात सर्वाधिक उंचीवर असलेल्या पाच विमानतळांपैकी हे एक आहे. हे विमानतळ देशातील 100 वं कार्यरत असलेलं विमानतळ ठरेल. समुद्रसपाटीपासून 4,500 फूट उंचीवर असलेलं हे विमानतळ 201 एकर क्षेत्रावर विस्तारलं आहे. सिक्कीममधील पाकयाँग विमानतळासाठी 605.69 कोटी रुपये खर्च आला आहे. हे विमानतळ अभियांत्रिकी कौशल्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर पाकयाँग विमानतळ आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!