Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

केंद्राचा मोठा निर्णय; परदेशी पाहुण्यांना पुढील महिनाभर देशात येण्यास अडचण

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

जगभरात वेगानं फैलावत असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी सरकारनं एक मोठा निर्णय जाहीर केलाय. आरोग्य आणि हवाई मंत्रालयाने अनेक नोटिफिकेशन्स जारी केले आहेत. या नोटिफिकेशन्सच्या अंमलबजावणीनंतर भारत पुढील महिनाभर संपूर्ण जगापासून स्वत:ला  वेगळे ठेवण्यासाठी प्रयत्न केला आहे.

ओवरसीज सिटिजन्स ऑफ इंडिया (OCI) कार्ड धारकांना मिळणाऱ्या सुविधाही १५ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर परदेशी नागरिकांना भारतात पर्यटनासाठी किंवा इतर कामकाजासाठी येणे अवघड होणार आहे.

खूप महत्त्वाचे काम असेल तर अशा वेळी भारतीय मिशनकडून विशेष परवानगी घेऊन पर्यटकांना देशात प्रवेश मिळणार आहे.  ‘मॅन टू मॅन कॉन्टॅक्ट’द्वारे फैलावत चाललेल्या करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवणे हा भारताचा या निर्णयामागचा हेतू असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

हे निर्णय आज रात्री १२ वाजेपासून लागू होणार असल्याचे समजते. भारत सरकारच्या नव्या ट्रॅव्हल ऍडव्हायजरीनुसार, भारताने जगातल्या कोणत्याही देशातून येणाऱ्या नागरिकांसाठी व्हिसा १५ एप्रिलपर्यंत निलंबित केला आहे.

केवळ संयुक्त राष्ट्राशी (यूएन) निगडीत कर्मचारी, डिप्लोमॅटिक प्रकरने आणि सरकारी प्रोजेक्टशी निगडीत अधिकाऱ्यांवर ही बंदी लागू होणार नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!