मसाप विभागीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नरेंद्र फिरोदिया

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरात 4 व 5 नोव्हेंबरमध्ये आयोजित महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्री. नरेंद्र फिरोदिया यांची एकमताने निवड करण्यात आली. मसापच्या अहमदनगर सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येेलुलकर यांनी दिली. फिरोदिया हे या शाखेचे अध्यक्ष आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे चे प्रमुख कार्यवाह सर्व प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, पदाधिकारी विनोद कुलकर्णी, राजन लाखे, वि. दा. पिंगळे , चंद्रकांत पालवे, तसेच सावेडी उपनगर शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मसाप सावेडी शाखेने फिरोदिया यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड वर्षात विविध उपक्रम यशस्वीपणे पार पाडले. त्यामुळेच त्यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली. मसापच्या अहमदनगर उपनगर, अर्थात सावेडी शाखेचे काम दीड वर्षापूर्वी सुरू झाले. या शाखेने या कालावधीत विविध उपक्रम घेऊन साहित्य चळवळीला चालना दिली.
विभागीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नगरमध्ये 20 वर्षांनंतर मोठा साहित्यिक उपक्रम होणार आहे. नगरचा नावलौकिक आम्ही या निमित्ताने कायम राखू. स्वागताध्यक्षपदाच्या जबाबदारीला पुरेपूर न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू, असेही फिरोदिया यांनी निवडीनंतर सांगितले.

 

LEAVE A REPLY

*