नारायण राणे यांची नव्या राजकीय पक्षाची घोषणा; ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’

0
नारायण राणे यांनी अखेर आज आपल्या नव्या राजकीय पक्षाची म्हणजेच ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ची घोषणा केली.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
उद्धव सरकारच्या निर्णयावर टीका करतात. मात्र, शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत का गप्प बसतात, असा सवालही राणेंनी उपस्थित केला.
पंतप्रधान मोदी, शरद पवार यांच्यावर टीका करण्याआधी उद्धव यांनी आत्मपरीक्षण करावे असा खोचक सल्ला राणे यांनी दिला.
सत्तेत राहून भांडण करण्यापलिकडे शिवसेनेने काहीच केले नाही. मुंबईतून मराठी माणस हद्दपार झाला असून त्याला शिवसेना जबाबदार असल्याची टीका नारायण राणे केली.

LEAVE A REPLY

*