तळवाडेच्या तरुणाचा नदीपात्रात पडून मृत्यू

0

 निफाड प्रतिनिधी | नांदूरमध्यमेश्वर येथे यात्रोत्सवासाठी आलेल्या तरुणाचा गोदावरी नदीपात्रात पडून मृत्यू झाला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की तळवाडे ता-निफाड येथील अजय मधुकर सांगळे(३२) हा तरुण नांदूर मध्यमेश्वर येथे काल मंगळवार १३रोजी यात्रेसाठी आला होता. दुपारी ४ वाजेच्या सुमारास सदर तरुण धारणयाच्या पाच गेट जवळील पुलाच्या पूर्व बाजूला गोदावरी नदीच्या कडेला खडकावर बसलेला असताना त्याचा तोल गेल्याने तो नदीपात्रात बुडाला जवळच राहणाऱ्या नागरिकांच्या सदर ची बाब लक्षात येताच त्यांनी आरडा ओरडा केल्याने शेजारील तरुणांनी नदीपात्रात उड्या मारून तरुणाला बाहेर काढले मात्र तोपर्यंत सदर तरुण अजय मधुकर सांगळे वय ३२ वर्ष याचा मृत्यू झाला होता परिसरातील नागरिकांनी याबाबत ची माहिती सायखेडा पोलिसांना कळविताच पो.नि.अंबादास मोरे यांनी तळवाडे येथील सांगळे कुटुंबियांना माहिती दिल्याने कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या घटनेने तळवाडे परिसरात शोककळा पसरली असून रात्री उशिरा पर्यंत सायखेडा पोलिसांनी या घटनेची माहिती घेण्याचे काम सुरु केले होते.

LEAVE A REPLY

*