नांदूरमध्यमेश्वर धरणाचे दोन्ही कालवे फुटले

0

निफाड : नांदूरमध्यमेश्वर धरणात दारणा धरणाचे पाणी दोन दिवसांपूर्वीच पोहोचले आहे. मात्र येथील धरणाचा डावा आणि उजवा कालवा फुटल्याची घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून दारणा धरणाचे पाणी नांदूर मध्यमेश्वरमधून नगर जिल्ह्यात पिण्यासाठी आणि शेतीसाठी देण्यात आले आहे.

पाण्याच्या दाबामुळे येथील दोन्ही कालवे कालवे फुटल्यामुळे पाणी वाया गेल्याची चर्चा परिसरात रंगली होती. दरम्यान, सिन्नर आणि निफाड तालुक्याच्या सिमालगत भागातील दहिवाडी जवळ उजवा कालवादेखील फुटल्याची माहिती देण्यात आली आहे.

डाव्या कालव्यातून ५०० क्युसेस तर उजव्या कालव्यातून ६०० क्युसेस पाण्याची क्षमता आहे. दोन्ही कालवे बारा तासांच्या अंतराने फुटले असल्याचे समजते. यातील एक मध्यरात्री बारा वाजता तर दुसरा कालवा दुपारी बारा वाजता फुटला.

LEAVE A REPLY

*