Type to search

नंदुरबार

राजेंद्रकुमार गावीत यांचा मध्यप्रदेशात गौरव

Share

नंदुरबार | प्रतिनिधी –

आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी, साहित्य, कला, क्रीडा अकादमी व अन्य विविध संस्थांच्या माध्यमातून राजेंद्रकुमार गावीत हे समाजाच्या उध्दारासाठी योगदान देत आहे. यातून राष्ट्र उभारणीच्या कार्यात मोठा हातभार लावण्याचा ते प्रयत्न करीत आहे. गावीत यांच्या या कार्याला विविध पातळीवर सन्मानित करण्यात आले असतांनाच मध्यप्रदेशातूनही त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली आहे.

त्यांना भोपाळ येथील एका समारंभात नॅशनल प्राईड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नटावद ता. नंदुरबार येथे स्थापन झालेल्या आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीला सामाजिक दायित्वाच्या दृष्टीने मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. कै. कृष्णराव गावीत यांनी ही संस्था स्थापन करीत महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याच्या पवित्र कार्यास सुरुवात केली होती.

त्यांच्या पश्चात त्यांचे पूत्र राजेंद्रकुमार गावीत यांनी संस्थेची धुरा नेटाने सांभाळत ज्ञानार्जनाच्या कार्यात काही पटींनी भर टाकली. मंत्रालयात अधिकारी असल्याने जबाबदार्‍यांचा व्याप अधिक असतानाही राजेंद्रकुमार गावीत यांनी संस्थेची जबाबदारी पेलवत सामाजिक कार्यातदेखील त्यांनी बहुमुल्य योगदान दिले. ज्ञानदान, अन्नदान, धनदान,  अडल्या-नडलेल्यांना मदतीचा हात, साहित्य अकादमीच्या माध्यमातून लेखन कार्यास चालना व वाचन संस्कृती रुजविण्याचा सातत्याने प्रयत्न केले. अनेकांची व्यसनातून सुटका करीत त्यांचे कौटुंबिक पुनर्वसनही राजेंद्रकुमार गावीत यांनी केले.

त्यांच्या या कार्याची दखल विविध संस्थांनी घेतली असून राष्ट्रीय भारत विद्या गौरव, ग्लोबल अचिव्ह अवार्ड, खान्देश आयकॉन, समता रत्न, आदर्श संस्थाचालक, एक्सीलन्स अवार्ड अशा पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. त्यानंतर गावीत यांच्या या सेवेची दाखल घेत मध्य प्रदेशातूनही घेण्यात आली असून भोपाल येथील एका समारंभात त्यांना नॅशनल प्राईड या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ईलाताई गावित, डॉ. विभूती गावित आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!