महावितरण आपल्यादारी अभियानास सुरुवात

0
शहादा । दि.29 । ता.प्र.-महावितरण वीज कंपनीने वीज गळती तसेच इतर अडचणी कमी करण्यासाठी समाजातील अनुसूचित जाती जमाती व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना वीज जोडण्यासाठी महावितरण आपल्यादारी या अभियानाची सुरूवात धडगांव परिसरातून होत आहे. नागरीकांनी याचा लाभ घेण्याचे अधिक्षक अभियंता राजेंद्र चव्हाण यांनी केले.
अनेक भागात आकडे टाकून वीज चोरी करण्याच्या घटना, एकाच रोहित्रवर क्षमतेपेक्षा जास्त अवैध वीज उचलल्याने रोहित्र जळणे, स्फोट होणे आदी घटना होतात.
यातून काही वेळा निधीतून हानी होणे हे टाकण्यासाठी समाजातील अनुसूचित जाती जमाती व आर्थिक दृष्टी दुर्बल घटकांसाठी महावितरण आपल्यादारी ही संकल्पना महावितरण व्यवस्थापकीय संचालक संजीव गुप्ता तसेच औरंगाबाद जॉईंट सेक्रेटरी ओमप्रकाश बकोरीया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच सातपुडा आदिवासी धडगांव तालुक्यापासून सुरू होत आहे.

या अभियानात वीज जोडणी करीता कर्मचार्‍यास रहिवाशी पुरावा, 150 रूपये अनामत व 50 रूपये वीज जोडणी असे 200 रूपयात वीज जोडणी होणार आहे.

शहादा विभाग अंतर्गत सर्वच तालुक्यात अभियान सुरू झाले आहे. धडगांव येथे पहिल्याच दिवशी 42 ग्राहकांनी वीज जोडणी केली. तळोदा येथे 51 सुलतानपूर 55, मंदाणे 30, वीज जोडणी केली आहे.

वीज ग्राहकांना अवास्तव वीज बिल आल्यास ग्राहकांनी त्वरीत संबंधित विभागाशी संपर्क करून वीज बिलातील दुरूस्ती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्री.चव्हाण यांनी सांगितले, वीज कनेक्शन ग्राहक संख्या वाढल्यास वीज आकारणी दर कमी करू, आदिवासी भागात वीज पुरवठा सतत ठेवण्यासाठी रोहित्र संख्या वाढवून देवू असे सांगितले.

शहादा कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांनी सांगितूर्लेें, वीज चोरी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व आदिवासी पाडयापर्यंत वीज पुरवठा सतत रहावा.

यासाठी वीज वितरण कंपनी आपल्यादारी अभियान राबवित आहे. या अभियानास चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आदिवासी समाजातील देखील वीज कनेक्शन नियमात करून घेण्याची जागृतात आल्याने कंपनीस सोपस्कर होणार आहे.

यावेळी सहाय्यक अभियंता मनोज पंदारे, शहादा विभाग एक उपकार्यकारी अभियंता आर.एल. मोरे, जगदिश पावरा आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*