तळोदा हस्ती बॅकेला सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्कार

0
चिनोदा । दि.29 । वार्ताहर-दी हस्ती को.ऑप बँकेला पाचव्या गटातून सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्कार म्हणून तळोदा शाखेला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दोंडाईचा मुख्यालय असलेल्या राज्यभर कार्यविस्तार असलेल्या, उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दी हस्ती को.ऑप. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत दरवर्षाप्रमाणे यावर्षाचा सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्कार वितरण प्रदान करण्यात आला. पाचव्या गटात 10 कोटीच्या आतील व्यवसाय झाल्याने तळोदा येथील दी हस्ती को.ऑफ बँकेला सर्वोत्कृष्ट शाखा म्हणून गौरविण्यात आले.

यावेळी पुरस्कर वितरण संचालक अ‍ॅड.अशोक गुजराथी यांच्या हस्ते तळोदा शाखेच्या वतीने समिती चेअरमन किर्तीकुमार शाह, सदस्य अरुण मगरे, कांतीलाल जैन, दिनेश चौधरी, शाखा व्यवस्थापक किशोर चौधरी यांनी स्वीकारला . यावेळी बँकेचे अध्यक्ष कैलास जैन, उपाध्यक्ष पहलाज माखिजा, जेष्ठ संचालक मदनलाल जैन, शांताराम नाईक, राजेंद्रकुमार चोपडा, नथ्थू धनगर, डॉ.दिलीपकुमार चोराडिया, दिलीप पाटील, धनेश लुणावत, प्रा.दिलीप वाघेला, डॉ.आशाताई टोणगांवकर, मधुबाला जैन, गिरीविहार शाखा समिती चेअरमन यशवंत स्वर्गे, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरीया, जनरल मॅनेजर माधव बोधवणी यांच्यासह सर्व संचालक व सर्व शाखांचे समिती चेअरमन उपस्थित होते.

बँकेच्या प्रत्येक शाखेत व्यवसायवृध्दी होऊन बँकेच्या विकासात भर पडावी, यासाठी बँकेचे आधारस्तंभ कांतीलाल जैन यांच्या प्रेरणेने ही पुरस्कार योजना राबविली जात आहे.

आर्थिक वर्षात लक्षपूर्ती, थकबाकी वसुली, बँकेच्या नफा तसेच शाखेतील व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न या बाबींचे परीक्षण करून सर्वोत्कृष्ट शाखेची निवड होते.

याबाबद्दल तळोदा शाखा व्यवस्थापक व समितीचे व कर्मचारी वर्गाचे बँकेचे अध्यक्ष कैलास जैन, उपाध्यक्ष पहलाज माखिजा व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरीया, सरव्यवस्थापक माधव बोधवाणी यांनी अभिनंदन केले.

 

LEAVE A REPLY

*