भाजपाचे तिकिट डॉ.हीनालाच – आ.डॉ.गावित

0
नंदुरबार । आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून खा.डॉ.हीना गावित यांनाच उमेदवारी दिली जाणार असून प्रचाराला सुरुवातही केली आहे, अशी माहिती आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, आता खुल्या प्रवर्गातील बीपीएलधारक महिलांनाही गॅस वाटप करण्यात येणार असल्याचे खा.डॉ.गावित यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून आ.डॉ.विजयकुमार गावित व खा.डॉ.हीना गावित हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आज डॉ.हीना गावित यांनी आज उज्वला गॅस योजनेबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी आ.डॉ.विजयकुमार गावित म्हणाले,

आपण कुठल्याही पक्षात प्रवेश करणार असून लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून खा.डॉ.हीना गावित यांनाच तिकिट दिले जाणार आहे. त्या पार्श्वभुमीवर आम्ही प्रचारही सुुरु केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खा.डॉ.गावित म्हणाल्या, मतदार संघात आतापर्यंत 95 हजार महिलांना गॅस वाटप करण्यात आले आहे.

पुर्वी फक्त 27 टक्के लोक गॅसचा वापर करायचे, आता 65 टक्के लोकांकडे गॅस आला आहे. फक्त 35 टक्के लोक गॅसपासून वंचित आहेत. त्यांनाही लवकरच गॅसचे वाटप करण्यात येणार आहेत. उज्वल गॅस योजनेसाठी 5 कोटीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट पुर्ण झाले असून आता नव्याने 3 कोटी गॅसचे वाटप करण्यात येणार आहे. आता केवळ आदिवासींना गॅसचा लाभ देण्यात येणार नसून खुल्या वर्गालाही त्याचा लाभ मिळेल. असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*