पालकांना अपमानास्पद वागणूक ओसर्ली, आराळे जि.प.शाळेबाबत पं.स.सदस्याची तक्रार

0
नंदुरबार । प्रतिनिधी-तालुक्यातील ओसर्ली, आराळेसह इतर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांना नेहमी अरेरावी करून अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप पं.स.सदस्या सौ.रिना गिरासे यांनी केला.
पंचायत समितीची सर्वसाधारण आढावा बैठक स्व.हेमलताई वळवी सभागृहात सभापती रंजना नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
व्यासपीठावर उपसभापती ज्योती पाटील, ग्राम पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी बिर्‍हाडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता बडगुजर, लघुसिंचनचे उपअभियंता शिंदे आदी उपस्थित होते.

अजेंडयावर सहा विषयांवर चर्चा करण्यात आली. आढावा बैठकीत शिक्षण विभागाच्या मुद्यावर सदस्या रिना गिरासे यांनी चांगलाच समाचार घेतला.

तालुक्यातील ओसर्ली, आराळेसह काही जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या पालकांशी नेहमी अरेरावीची भाषा करून अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.

अशाप्रकारामुळे शिक्षणाचा दर्जा खालावल्याची भिती व्यक्त करीत कारवाईची मागणी करण्यात आली. यावर गटशिक्षणाधिकारी सी.के. पाटील यांनी संबंधित शाळेला भेट देणार असल्याचे सांगितले.

बैठकीत सामाजिक वनीकरण, विद्युत वितरण कंपनी, कृषी, एस.टी.महामंडळ, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत, बांधकाम, लघुसिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, मग्रारोहयो, एकात्मिक बाल विकास योजना, समाज कल्याण या विभागांचा आढावा खातेप्रमुखांनी सादर केला.

 

LEAVE A REPLY

*