‘सरकारच्या कल्याणकारी योजनां’वर प्रचार मोहीम

0
नवापूर । दि.29 । प्रतिनिधी-केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रसिध्दी संचालनालय महाराष्ट्र व गोवा प्रदेश व व ग्रामपंचायत, रायपुर यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर तालुक्यातील रायपूर येथे ग्रामपंचायतच्या प्रांगणात केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना ह्या विषयावर एक विशेष व्यापक प्रचार मोहीम राबविण्यात आली.
नवापूर तालुक्यातील रायपूर येथे ग्रामपंचायतच्या प्रांगणात गावातील महिला-मुलीसाठी संगीत खुर्ची स्पर्धा, सुद्रुढ बालक स्पर्धा, सकस आहार स्पर्धा आणि निबंध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले.
28 जूनला आदर्श माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, ग्रामस्थ व अधिकारी वर्गाची गावातून जनजागरण प्रचार फेरी काढण्यात आली.
त्या जनजागरण प्रचारफेरीचे उद्घाटन रायपूर येथील सरपंच ईश्वर नुरजी गावीत व आनंद पाडवे, पोलीस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, नवापूरचे तहसिलदार प्रमोद वसावे, सभापती श्रीमती सविता सुरेश गावीत, उपसभापती दिलीप गावीत, पं.स. सदस्य जालसिंग गावीत, गटविकास अधिकारी एन.डी.वालेकर, योगाशिक्षक वासुदेव विठ्ठल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.टी. कोकणी, श्रीमती वैशाली पाटील, आर.के.गावीत, युनियन बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक नितेश गुप्ता, डॉ.राहुल चौधरी, श्रीमती सी.डी.पी.ओ. पी.एम.पिपसे, सरपंच ईश्वर नुरजी गावीत, पोलीस पाटील आनंद पाडवे, एस.एफ. ठाकरे, मुख्याध्यापक ए.एम.पाटील तसेच पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला योगा शिक्षक वासुदेव विठ्ठल पाटील यांनी योगाविषयी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करतांना सर्व आसने, त्यांचे महत्व पटवून दिले. तसेच योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छ भारत अभियान व सरकारच्या योजना माहिती सविस्तर मार्गदर्शनातून जनतेला दिली. तसेच रायपुर हे पूर्णतः हगणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले.

सर्वांनी शौचालयाचा वापर करावा असे सागितले. विविध स्पर्धांचे पारितोषिके प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरीत करण्याच आले.

कार्यक्रमाच्या शेवटी जि.प. अध्यक्षा श्रीमती रजनीताई नाईक यांनी महिलांना मार्गदर्शन केले व सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

 

 

LEAVE A REPLY

*