यशवंत महाविद्यालयाच्या क्रीडापटूंना जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते शिष्यवृत्ती धनादेश वाटप

0
नंदुरबार । दि.6 । प्रतिनिधी-नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबारच्यावतीने खेळलेले राष्ट्रीय क्रीडापटू भरत शिवाजी कुंभार (टेनिक्वाईट), अमोल सुधाकर चित्ते (टेनिक्वाईट), सौरभ अशोक कानोसे (बॉल बॅटमिंटन), दीपाली पदमसिंह जोहरी (बॉल बॅटमिंटन), ममता सुनिल फटकाळ (फ्लोअर बॉल) या क्रीडापटूंना महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोेजित राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व केल्याबद्दल शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रत्येकी 3750 रुपये शिष्यवृत्ती धनादेश जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, नियोजन अधिकारी श्री.जोशी, तालुका क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे, यशवंत महाविद्यालयाचे प्रा.मयुर ठाकरे, मिलिंद वेरुळकर, मुकेश बारी आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी कामगिरी करणार्‍या क्रीडापटूंना शिष्यवृत्ती धनादेश वाटप करुन पुढील क्रीडा क्षेत्रातील वाटचालीसाठी जिल्हाधिकार्‍यांनी शुभेच्छा दिल्यात.

महाविद्यालयातील यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष श्रीमती विमलताई रघुवंशी, संचालक आ.चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोजभैय्या रघुवंशी, सचिव यशवंत पाटील, प्राचार्य शिवाजी पाटील, पर्यवेक्षक अरुण हजारी आदींनी अभिनंदन केले आहे.

 

LEAVE A REPLY

*