Type to search

maharashtra नंदुरबार

गुजर समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात 17 जोडप्यांचे शुभमंगल

Share
नंदुरबार । समस्त लेवा पाटीदार गुजर समाज, गुजर समाज मंचतर्फे चौथा सामुदायिक विवाह सोहळा तालुक्यातील लहान शहादा येथे उत्साहात संपन्न झाला. या विवाह सोहळयात 17 जणांचे शुभमंगल करण्यात आले. या लग्नसोहळ्यात 3 राज्यातील सुमारे 20 हजार समाज बांधव उपस्थित होते.

तालुक्यातील लहान शहादा येथे जवाहरलाल नेहरू विद्यालयापासून सजविण्यात आलेल्या वाहनातून वरांची सकाळी 9 वाजता मिरवणूक काढण्यात आली. 10 वाजता सर्व वर विवाहस्थळी दाखल झाले. या ठिकाणी 17 जोडप्यांचा ब्राम्हवृदांच्या मंगलाष्टकांनी व शहनाईच्या मंद सुरात उत्साहात शुभमंगल सोहळा संपन्न झाला. यावेळी खा.डॉ हिना गावित, सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, आ.डॉ विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आ.के.सी पाडवी,जि.प.सदस्य अभिजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. रोहयो, पर्यटन विकास तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मोबाईलचा माध्यमातून दिलेला संदेश वाजविण्यात आला.

याप्रसंगी अखिल भारतीय लेवा पाटीदार समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती कमलबेन पुरुषोत्तम पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील,माजी मंत्री पद्माकर वळवी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, पत्रकार रमाकांत पाटील, नंदुरबार नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष परवेज खान, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, साने गुरुजी विद्यालय प्रसारक संस्थेचे समन्वयक मकरंद पाटील, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुनील पाटील, जिज्ञासा दीदी, देव मोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, नगरसेविका ज्योती पाटील, सुनील पटेल, महेंद्र पाटील, जगदीश पाटील, अ‍ॅड.प्रभाकर पाटील, रघुनाथ पाटील, महेंद्र पाटील, मुरार पाटील, दशरथ पाटील, सौ.माधवी पटेल, प्रिती पाटील, वसंत पाटील, संजय पाटील, डॉ.सविता पाटील आदी उपस्थित होते.

अत्यावक्षक सेवा तैनात
विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने मदतीसाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जात होती. कोणाला इजा झाल्यास तात्काळ उपचार व्हावेत यासाठी डॉक्टरांचे पथक व 2 रुग्णवाहीका सज्ज होत्या. त्याचप्रमाणे अग्निशमन दलाची गाडीही तैनात करण्यात आली होती.

नवरदेवांचे पाणी वाटपाने श्रमदान
सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून समस्त लेवा पाटीदार गुजर समाज, गुजर समाज मंच तसेच विविध शहरे ग्राम गुजर मित्र मंडळाच्या वतीने तयारी करण्यात येत होती. महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून 20 हजारांवर वर्‍हाडी या सोहळ्याचे साक्षीदार झाले.अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोहळा पार पडला. यावेळी समशेरपूर येथील राकेश पाटील व निझर येथील मुकेश पाटील या नवरदेवांनी पाणी वाटप करून श्रमदान केले.

150 युवक- युवती स्वयंसेवक
समाजातील युवकांकडून या कार्यास मोठा प्रतिसाद मिळाला. विवाहसोहळ्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या.त्यात स्वागत समिती, भोजन समिती, मंडप समिती, स्वच्छता समिती, पाणी पुरवठा, इलेक्ट्रिक समिती, ध्वनिक्षेपक समिती, वधू-वर मिरवणूक समिती,सजावट समिती, अकस्मात समिती आदी विविध समित्यांच्या समावेश करण्यात आलेला आहे. या समित्यांच्या माध्यमातून समाजातील 150 युवक- युवतींनी हिरीरीने सहभाग घेत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!