Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नंदुरबार विधानसभा निवडणूक २०१९

नंदुरबार : १२ लाख २६ हजार मतदार ठरविणार चार आमदारांचे भवितव्य

Share

नंदुरबार | महेश पाटील

नंदुरबार जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदार संघातून १ हजार ३८५ मतदान केंद्रातील एकुण १२ लाख २६ हजार मतदार उमेदवारांचे भवितव्य निश्‍चीत करणार आहेत.

चारही मतदार संघातून एकुण २६ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. मतदान केंद्रांवर होणार्‍या मतदानासाठी एकुण ६ हजार १०० कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून मतदान कर्मचारी मतदानस्थळी रवाना झाले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे तयारी पूर्ण करण्यात आली आहे आज रविवारी दि.२० रोजी सकाळी सात वाजेपासून शहरातील जिल्हा क्रिडा संकुलावर तर तीन विधानसभा मतदान क्षेत्रातील मुख्यालय मतदान कामी नियुक्त कर्मचारी अधिकारी उपस्थित झाले होते त्याआधी कर्मचार्‍यांना नियुक्त मतदान केंद्रावर विहित वेळेत मतदान साहित्य वाटप करण्यात येऊन मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्रात १ हजार ३८५ मतदान केंद्र आहेत.

त्या मतदान प्रक्रियेसाठी केंद्रांवर ६ हजार १०० अधिकारी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना बुथ निहाय मतदान साहित्याचे वाटप करण्यात येऊन मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले.

वाहनांची व्यवस्था
मतदान केंद्रावर मतदान साहित्य पोचवण्यासाठी व परत आणण्यासाठी विधानसभा क्षेत्र निहाय परिवहन महामंडळाच्या बसेस व खाजगी लहान वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
जिल्हयातील अक्कलकुवा मतदार संघात ६, शहादा ४, नंदुरबार ६ व नवापूर १० असे एकुण २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हयात एकुण १२ लाख २६ हजार ११७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात अक्कलकुवा २ लाख ७८ हजार ८४५, शहादा ३ लाख २० हजार ४०९, नंदुरबार ३ लाख ३८ हजार ९४१ च नवापूर २ लाख ८७ हजार ९२२ मतदारांचा समावेश आहे.

जिलह्यात ४०१ सैनिक मतदार आहेत. अक्कलकुव्यात ३४९, शहादा येथे ३३९, नंदुरबार येथे ३६१ तर नवापूर येथे ३३६ असे एकुण १ हजार ३८५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे.

 

सदर मतदानासाठी ६ हजार १०० अधिकारी – कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १०७ – बसेस, ६०६- जीप, ११-ट्रक व ४-बार्ज लागणार आहेत. अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातील मणिबेली, चिमलखेडी, धनखेडी, मुखडी, डनेल, बामणी, भादल, उडदया, भाबरी या मतदान केंद्रावर बार्जद्वारे पाठविण्यात येणार आहेत. निवडणुकीसाठी एकुण-१६४ क्षेत्रिय अधिकारी नेमण्यात आले आहेत.१ हजार ७०६ कंट्रोल युनीट, १ हजार ७०६ बॅलेट युनीट व १ हजार ७७१ व्हीव्हीपॅट मतदान केंद्रांवर करण्यात येणार आहेत.

जिल्हयात एकुण-२८२८ दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आली असून त्यांच्यासाठी ७४९ व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना मतदान करण्यासाठी एकुण-६८६ स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा मतदार संघात गंगापूर, शहादा, नंदुरबार व नवापूर येथे महिला संचलित मतदान केंद्र कार्यरत आहेत.

देवमोगरा, जुने धडगांव, नंदुरबार व नवापूर हे आदर्श मतदान केंद्र कार्यरत आहेत. अक्कलकुवा मतदार संघाती अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील, मुखडी, झापी व भादल या मतदान केंद्रावर तात्पुरते मतदान केंद्र तयार करण्यात येत आहेत. १४६ मतदान केंद्रावर वेबकॉस्टींग करण्यात येणार आहे.

कोयली विहीर, नवागांव, नवागांव, व सुकवेल हे संवेदनशील मतदान केंद्र आहेत. चारही विधानसभा क्षेत्रात एक पोलीस अधीक्षक, एक अप्पर पोलीस अधीक्षक, चार उपअधीक्षक, १५ पोलीस निरीक्षक, ४७ सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, १ हजार ९४ कर्मचारी व ८९५ होमगार्ड यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

बाहेरुन ५ पोलीस निरीक्षक, २० सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, २५२ कर्मचारी व २०० होमगार्ड गुजरात राज्यातून मागविण्यात आले आहेत. याशिवाय पॅरामिलीटरी फोर्सही मागविण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!