लांबोळा येथे रेशनचा ट्रक अडवला ; ट्रकचालकास मारहाण

0
शहादा । ता.प्र.-तालुक्यातील लांबोळा येथे एसी सरकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक वितरणासाठी जाणघरा रेशनचा माल भरलेला ट्रक अडविला.
ट्रकचालकास काहींनी मारहाण केल्याने चालकाने ट्रक जागेवर सोडून पलायन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.20 रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास प्रकाशा गोदामातून सार्वजनिक वितरणासाठी रेशनचा माल भरून ट्रक शहाद्याकडे रवाना झाला.
एसी सरकार संघटनेच्या कार्यकत्यांना सदर माल सार्वजनिक वितरणाऐवजी काळ्या बाजारात नेला जात असल्याचा संशय आला.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा ट्रक (क्र.एम.एच.41, जी. 381) शहाद्यानजीक अडविला. ट्रकचालकाला विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने कार्यकर्त्यांनी त्यास मारहाण करून याबाबत शहादा पुरवठा विभागाशी संपर्क साधला.

रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयात सार्वजनिक वितरणाचा ट्रकमधील रेशनमालासह तहसील कार्यालय आवारात उभा करण्यात आला.

ट्रकचालकाकडे मनरद येथील स्वस्त धान्य दुकानाचे परमीट होते व ट्रकमध्येच स्वस्त धान्य दुकानदारही होता. मात्र, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कागदपत्रांची पडताळणी करण्याऐवजी ट्रक चालकाला मारहाण केली.

याप्रकरणी कुठलाही प्रकारचा गुन्हा अथवा फिर्याद पोलीसात नोंदविण्यात आलेली नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्थेलचा माल नेमका संबंधीत स्वस्त धान्य दुकानात जातो की आणखी दुसरीकडे या विषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

वारंवार घडणार्‍या या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहादा तहसीलदार तसेच पुरवठा विभागाने संबंधीतांना आदेश देवून नियमानुसार सार्वजनिक वितरणासाठीचा रेशन माल वेळेवर वाहतुक करावी, असे निर्देश देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

*