पाटील शैक्षणिक संकुलात वृक्षदिंडी

0
शहादा । ता.प्र.-शहादा वनविभागातर्फे लोकसहभागातून वृक्ष लागवड करण्यासाठी कै.डॉ.विश्रामकाका पाटील शैक्षणिक संकुल आवारात माजीमंत्री आ.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पूजन करण्यात आले.
शेठ व्ही.के. शहा विद्या मंदिराच्या प्रांगणातून निघालेल्या वृक्ष रॅलीस मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम यांनी हिरवी झेंडी दाखविली.
नंदुरबार जिल्हा वनविभागाच्यावतीने दि.1 ते7 जुलै दरम्यान जिल्ह्यात 10 लाख 50 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे.
लोकसहभागातून प्रचार प्रसाराच्या माध्यमातून वन वन्यजीव संवर्धन व संरक्षण प्रभावीपणे करण्याकरीता आज वृक्षदिंडी व वृक्षरॅली काढण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम होते. आ.डॉ.विजयकुमार गावत, उपवनसंरक्षक पियुषा जगताप, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, तहसिलदार मनोज खैरनार, जि.प. सदस्य अभिजीत पाटील, वनश्री हैदरभाई नुरानी, सामाजिक वन अधिकारी सुरेश मोरे, मंदाणा ग्रा.पं. उपसरपंच अनिल भामरे, सहाय्यक वन संरक्षक पी.पी. सुर्यवंशी, वनक्षेत्रपाल अनिल पवार, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.किशोर पाटील, जिल्हा सरचिटणीस दिनेश खंडेवाल, नगरसेवक संदिप पाटील, प्राचार्य छोटूलाल चौधरी, उपप्राचार्य एच.एम.पाटील आदी उपस्थित होते.

आ.डॉ.गावीत यांच्या हस्ते वृक्ष दिंडीचे पुजन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप वन संरक्षक पियुषा जगताप यांनी केले. वातावरणातील तापमान रोखण्यासाठी वृक्ष लागवड व जगविणे काळाची गरज आहे.

यावर्षी जिल्ह्यात 10 लाख 50 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असतांना 16 लाख 50 हजार नोंद झाली. म्हणजेच सहा लाख झाडे जादा नोंद झाली आहे.

वृक्ष लागवडीसाठी ासन प्रशासनासह सामाजिक सहकारी संस्था व लोकसहभाग मोठया प्रमाणात असल्याने वृक्ष लागवड अभियान भविष्यात यशस्वी ठरणार आहे.

आ.डॉ.गावीत म्हणाले की, हवेतील अनियमीतेमुळे पाऊस वेळेवर न येणे तसेच कमी जास्त पाऊस त्सुनामी येणे आदी प्रकार होतात.

याची काळजी घेणे आवश्यक आहे. ऑक्सीजन घेण्याकरीता व कार्बन डायऑक्साईड सोडण्यासाठी झाडांची आवश्यकता आहे.

स्वतःच्या आरोग्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष उप वनसंरक्षक राजेंद्र कदम यांनी सांगितले की, व्यक्तीपरत्वे प्राण वायु सुरू असतो सहा कोटी प्राणवायु माणूस घेतो.

त्यासाठी वृक्ष लागवड महत्वाचे आहे. राज्यात 2 कोटी 50 लाख विद्यार्थी आहे. त्यांना 7 लाख 50 हजार शिक्षक मार्गदर्शन करतात.

याच माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धन प्रचार चांगला होता. स्वच्छ हवा पाण निर्मळ वार्‍यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे. झाडे लावणे व ते जगविणे आवश्यक आहे. भारतात प्रति व्यक्ती 24 झाडे आहेत. संख्या कमी असल्याने झाडे लावणे कर्तव्य नव्हे तर जबाबदारी आहे.

वृक्ष दिंडी व वृक्ष रॅली शाळेच्या प्रांगणातून निघून दोंडाईचा रोड मेनरोड तहसिल कार्यालय, महात्मा गांधी पुतळा, गांधी नगर, जनता चौक होत रॅलीचा समारोप झाला.

शेठ व्ही.के. शहा विद्या मंदिर, वसंतराव नाईक माध्यममिक विद्यालय, इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय भोई तर आभार रामकृष्ण लाम्हगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरीता वनक्षेत्राल अनिल पवार, एम.एस. फुलपगारे, प्रविण वाघ, एस.व्ही. भाबड आदींनी सहकार्य केले.

 

LEAVE A REPLY

*