तोरणमाळ येथे पर्यटकांकडून वृक्षारोपण

0
ब्राम्हणपुरी । वार्ताहर-तोरणमाळ येथे जाणार्‍या पथकाकडून वृक्षारोपण करण्यात आले.
सातपुडा पर्वत हा बोडखा होत चालला आहे. तेथील जनजीवन मानवी वस्तीकडे धाव घेतांनाचे चित्र दिसून येत आहे.
तेथील दिवसेंदिवस कमी होत असलेल्या वृक्षांबाबत वृक्षप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे पर्यटक येत असतात.

परंतु दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत असल्याने याठिकाणी तापमानात वाढ होत आहे. आवगे व ब्राम्हणपूरी, सुलतानपूर येथील पर्यटक वृक्षप्रेमींनी तोरणमाळ येथे यशवंत तलावाच्या आवारात तसेच विविध भागात वृक्षारोपण केले.

यावेळी पर्यटक विनोद पाटील, सचिन पाटील, सुदर्शन कटारे, अरविंद कापडे, भूषण खैरनार, राधेश्याम कुलथे, शांतीलाल चित्ते, सतीष कोळी, अनिल पाटील, रमेश पाटील, अशोक ठाकरे आदींनी वृक्षारोपण केले.

 

LEAVE A REPLY

*