शिक्षक दिनेश वाडेकर राष्ट्रीय साने गुरुजी आदर्श पुरस्काराने सन्मानित

0
नंदुरबार । दि.29 । प्रतिनिधी-पुणे येथील काव्यमित्र संस्थेतर्फे येथील डी.आर. विद्यालयातील शिक्षक दिनेश वाडेकर यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय साने गुरूजी आदर्श पुरस्कार देण्यात आला आहे.
शिक्षक दिनेश वाडेकर हे डी.आर. विद्यालयात उपशिक्षक या पदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सतत कार्यशील असतात.
तसेच समाजसेवा, विज्ञानछंद मंडळ, महाराष्ट्र गणित व विज्ञान अध्यापक महामंडळ, राष्ट्रीय बालविज्ञान परिषद, विज्ञान प्रदर्शन, एडस जनजागृती, सर्व शिक्षा अभियान यांसारख्या अनेक राज्यस्तरीय शिबीरांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे.

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सलग आठ वेळा त्यांनी सहभाग नोंदवून राष्ट्रीय स्तरावर त्यांची तीन वेळा निवड होऊन दोन वेळा त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे.

यापूर्वी त्यांना कै.मक्कनराव चॅरीटेबल ट्रस्टतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ.अपुर्व हिरे फाऊंडेशनतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार, तसेच नंदुरबार एज्युकेशन सोसायटीतर्फे गुणशिक्षक पुरस्कार आणि लायन्स क्लबतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.

या सर्व शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेवून त्यांना हा राष्ट्रीय साने गुरूजी आदर्श पुरस्कार देण्यात आला.

यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे डीन डॉ.पी.ए. तुरबटमठ, राष्ट्रीय आयुर्वेदिक विश्वपरिषदेचे अध्यक्ष डॉ.राजाराम त्रिपाठी, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर, उद्योजक प्रथमेश जंगम, ज्येष्ठ कृषीतज्ञ रश्मीकुमार अब्रोल, संस्थाध्यक्ष राजेंद्र सगर आदी उपस्थित होते.

शिक्षक दिनेश वाडेकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गिरीश खुंटे, अध्यक्ष अ‍ॅड.परिक्षीत मोडक, उपाध्यक्ष नरेंद्र सराफ, सचिव प्रशांत पाठक तसेच संस्थेचे कार्यकारिणी सदस्य, सदस्या, प्राचार्य जी.एस. हिवरे, उपप्राचार्य प्रा.एस.व्ही. चौधरी, पी.सी. चौधरी, ए.के. जोशी, पी.डी. पिंपळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

 

LEAVE A REPLY

*