Type to search

नंदुरबार

तळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक

Share

सोमावल, ता.तळोदा वार्ताहर – अहमदाबादहून शिरपूरकडे येणार्‍या एस.टी.बसवर रात्री 1 वाजेच्या सुमारास अज्ञात 8 ते 10 इसमांनी दगडफेक केली. मात्र, बसचा चालकाच्या चातुर्य व प्रसंगावधानामुळे बसला सुसाट वेगाने थेट तळोदा येथे आणले. त्यामुळे सुदैवाने रस्ता लुटीची मोठी घटना टळली.

शिरपूर आगाराची अहमदाबाद-शिरपूर बस (क्र.एम.एच.20 बीएल4127) रात्री सुमारे 1 वाजता अकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावर तळोदापासून 7 कि.मी. अंतरावर गुजरात राज्यातील पिपलास गावाजवळून येत असतांना रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर उभे राहून 8-10 अज्ञात इसमांनी अचानक बसवर दगडफेक केली. सदर इसम दरोडेखोर असल्याचे लक्षात येताच बसचालकाने बस सुसाट वेगाने नेली. त्यामुळे चार इसमांनी मोटारसायकलवर बसचा

पाठलाग केला. यात दगडफेकीत बसच्या डाव्याबाजूकडील खिडक्यांच्या काचा फुटल्या. या बसमध्ये जवळपास 25 प्रवाशी प्रवास करीत होते. यात महिला व लहान मुलांचाही समावेश होता. तळोदा शहरापासून 7 कि.मी. अक्कलकुवा रस्त्यावर गुजरात राज्यात निझर तालुक्यात पिपलास हे गाव आहे. याबाबत घटनेची तळोदा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, या आधीही तळोदा तालुक्याला लागून असलेल्या गुजरात हद्दीत व्यापार्‍यांना लुटण्याचा घटना घडल्या आहेत. दरोडेखोर गुजरात- महाराष्ट्र राज्य हद्दीचा फायदा उचलत वाहनधारकांना लुटण्याचा प्रयत्न करतात. दसवड जवळील केदारेश्वर खांडसरीजवळ व्यापार्‍यांना दरोडेखोरांनी लुटले होते. तळोदा-नंदुरबार रस्त्यावर हातोडा पूल ते वाका चार रस्तादरम्यान प्रवाश्यांना लुटण्यात आले होते. या घटनेने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या भागातील बर्‍याच व्यापार्‍यांनी रात्रीच्या वेळी प्रवास करणे टाळले होते. परंतु या घटनेने रस्ता लुटीचा प्रयत्न विफल झाला असला तरी पोलीस प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अन्यथा भविष्यात फार मोठी किंमत मोजण्याची वेळ येईल, यात शंका नाही.

घटना घडल्यावर कार्यवाही होतच राहील. परंतु घटना घडू नये यासाठी महाराष्ट्र व गुजरात पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. अश्या रस्तालुटीच्या घटनांचा कायमचा बिमोड होणे आवश्यक आहे. पोलिसांनी रात्री गस्त वाढवून किंवा व्यापार्‍याना रात्रीच्या वेळेस रस्त्यावर न येण्याचे आवाहन या घटनेवर तात्पुरते उपाय असू शकतात, परंतु रातराणी बसेस कश्या बंद करता येतील? याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!