बापाचा दगडाने ठेचून मुलाने केला खून

0
आमलाड । वार्ताहर- तळोदा तालुक्यातील सोमावल शिवारातील लोभाणी येथे दारूच्या नशेत त्रास देणार्‍या वडीलांच्या डोक्यात दगड टाकुन मुलाने खून केल्याची घटना काल दि. 23 रोजी घडली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभाणी गावाचे सरपंच अनिल कचरू पाडवी शेतात गेले असता त्यांना सोमावल शिवारातील शेताच्या बांधावर अमरसिंग कोचरू पाडवी(47) रा.लोभाणी,ता.तळोदा हा मयत अवस्थेत आढळून आला. त्याचाजवळ रक्ताने भरलेला दगड दिसला. त्याच्या नाका तोंडातून रक्त येत होते. ही घटनेबाबत सरपंचांनी पोलीस पाटील यांना माहिती दिली.त्यानंतर सरपंच व पोलीस पाटील मयताचा मुलगा गणेश अमरसिंग पाडवी यास विचारले असता. त्याने सांगितले की, वडील अमरसिंग कोचरू पाडवी हे दारू पिवून त्याच्या आजीस त्रास देत होते.

घरातील खुर्चीही तोडून टाकली. दारूच्या नशेत त्याचा आईला त्रास देत असल्याने तिने पाच ते सहा वर्षापुर्वी दुसरी लग्न करून घेतले.त्यांचा त्रास वाढल्याने काल दि. 23 मार्च रोजी रात्री 7 वाजेच्या दरम्यान गवाणीपाडा येथे दारू पिण्यासाठी गेला असता वडीलांना परस्पर सोमावल शिवारातील शेतात नेवून 8 वाजेच्या दरम्यान डोक्यावर तीनवेळा दगड मारून ठार केले. याबाबत पोलीस पाटील कलावतीबाई आनंदा पाडवी रा.लोभाणी ता. तळोदा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश अमरसिंग पाडवी रा. लोभाणी,ता.तळोदा याचा विरूध्द तळोदा पोलीस ठाण्यात भादंवि 302, 342 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*