स्वाभिमानी संघटनेकडून शासन निर्णयाची होळी

0
नंदुरबार । दि.22 । प्रतिनिधी-शासनाने शेतकरी कर्जाबद्दल सतत बदलणार्‍या धोरणाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
याबाबत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे की, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने सतत धोरण बदलले आहे.
त्यामुळे जिल्हयातील शेतकरी संभ्रमात आहे. शासन अदानी, अंबानी यांना सुट देत आहे तर शेतकर्‍यांची वेळोवेळी वेगवेगळे निकष लावून दिशाभूल सुरु केली आहे.

ज्या शेतकर्‍यांनी इरिगेशनसाठी कर्ज घेतले आहे, त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून राज्य शासनाकडून काढण्यात आलेल्या कर्जमाफी निकषाचा निषेध करतो.

यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाने कर्जमाफीबाबत काढलेल्या शासन निर्णयाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी, प्रतिभा शिंदे, अंबालाल पाटील, वसंत पाटील, राजेंद्र पाटील, एकनाथ चौधरी, संजय पाटील, मनोज पाटील, लक्ष्मीकांत पाटील, मुकेश सामुद्रे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*